Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्ह्यातील तिनशे शिक्षकांना लागली लॉटरी ! बारा वर्षांची सेवा पुर्ण करणार्‍या शिक्षकांना सीईओंनी मंजूर केली वरिष्ठ वेतन श्रेणी, प्रत्येकाच्या पगारात झाली घसघसीत वाढ


बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शिक्षकांचा वरिष्ठ वेतन श्रेणीचा प्रश्‍न सीईओ अजित पवार यांनी मार्गी लावला आहे. बारा वर्षांची अर्हताकारी सेवा पुर्ण केलेल्या तिनशे शिक्षकांना सीईओंनी वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर केली आहे. त्यानुसार आता ‘एस 10’ वरून ‘एस 13’वर ह्या तिनशे शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी गेली आहे, या श्रेणीनुसार सदर शिक्षकांच्या पगारात घसघसीत वाढ झाली आहे.
प्रश्‍न छोटा असो की मोठा..प्रत्येकांच्या प्रश्‍नाला वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचे काम सीईओ अजित पवार हे करीत आहेत. त्यांच्या याच भुमिकेमुळे बीड जिल्हा परिषदेची कामे तळागाळापर्यंत पोहचू लागले आहेत. इतर विभागाप्रमाणेच त्यांचे शिक्षण विभागातही बारीक लक्ष असते. वास्तविक पाहता या विभागामार्फत काम करणार्‍या शिक्षकांचा एक प्रश्‍न मार्गी लावून त्यांना मोठा दिलासा देण्याचे काम सीईओंनी केले आहे. ज्या शिक्षकांची बारा वर्षांची सेवा पुर्ण झालेली आहे अशा तिनशे शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीच्या प्रस्तावाला त्यांनी चार जुलै 2022 रोजी मंजूरी दिली आहे. सीईओंनी दिलेली हीच मंजूरी जिल्ह्यातील शिक्षकांसाठी मोठी लॉटरीच मानली जात आहे. ‘एस 10’ वरून एस 13’ वर ह्या तिनशे शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी गेली आहे. या श्रेणीनुसार शिक्षकांच्या पगारातही घसघसीत वाढ झाली आहे. दरम्यान सीईओंनी घेतलेल्या या निर्णयाचे संपूर्ण शिक्षकांमधून कौतूक केले जात आहे.

आता ‘त्या’ तिनशे शिक्षकांची 35400 ते
112400 अशी असणार वेतन श्रेणी
ज्या शिक्षकांना सीईओंनी वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूरी केली आहे, त्यांची सध्याची वेतन श्रेणी 2900 ते 92300 (एस 10) अशी होती, आता ती वेतन श्रेणी 35400 ते 112400 (एस 13) अशी असणार आहे.

उच्च शैक्षणिक अर्हता असेल तरच
निवड श्रेणीचा मिळणार लाभ
वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ सेवेमध्ये एखदाच घेता येतो, त्यामुळे संबंधित शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळाल्याची नोंद मुळ सेवा पुस्तकामध्ये घेण्यात यावी, तसेच महाराष्ट्र नागरी सेवेतील तरतूदीनुसार संबंधित शिक्षकांची वेतन निश्‍चिती करून घ्यावी, असे आदेश सीईओंनी शिक्षण विभागाला दिले आहेत. दरम्यान या वेतन श्रेणीच्या लाभानंतर निवड श्रेणीसाठी उच्च शैक्षणिक अर्हता धारण करणे अवश्यक असल्याचेही सीईओंनी या आदेशात म्हटले आहे.

Exit mobile version