Site icon लोकाशा-बंब न्यूज

ऊस उत्पादकांसाठी या वर्षीच गजानन कारखाना सुरू करणार – आ. संदिप क्षीरसागर, वंजारवाडीत आ. क्षीरसागरांच्या हस्ते वृक्षांची केली लागवड, जिल्हातील आदर्श गाव म्हणुन वंजारवाडी गावाची ओळख


बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : नवगण राजुरी जिल्हा परिषद गटातील वंजारवाडी येथे मा.वैजिनाथ नाना तांदळे यांनी बुधवारी आयोजीत केलेल्या वृक्षारोपन कार्यक्रमात आमदार संदीपभैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. यावेळी त्यांनी सांगितले की जिल्हातील आदर्श गाव म्हणून वंजारवाडी गावाची एक वेगळी ओळख आहे. दरम्यान जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी या वर्षीच गजानन कारखाना सुरू करणार असल्याचे यावेळी आ. क्षीरसागरांनी सांगितले. त्यांच्या या एक्या वाक्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी सुखावला आहे.
श्री क्षेत्र किल्ले भगवानगड, वंजारवाडी हे मिनी महाबळेश्वर असल्याप्रमाणे वाटतं आहे. वाडीचे आणि राजुरीकरांचे अनेक वर्षांपासून जिव्हाळाचे संबंध आहेत. नाना आणि तात्यांच्या रूपाने ते कायम राहतील. स्व.काकूंचे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे. यावर्षीच आपण गजानन सहकारी साखर कारखाना सुरु करत आहोत. मतदार संघातील आणि राजुरी परिसरातील सर्व शेतकरी बांधव ऊस बागायदार व्हावा ही संकल्पना घेऊन बंद पडलेला कारखाना सुरु होत आहे, याचा मनस्वी आनंद होतं आहे, असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

Exit mobile version