Site icon लोकाशा-बंब न्यूज

झेडपीच्या पाणी पुरवठ्याला मिळाले कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता, जलजिवनमध्ये प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल नामदेव उबाळेंचा सीईओंनी केला सेवा गौरव


बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंत्याचा पदभार आतापर्यंत प्रभारी अधिकार्‍याकडेच होता, श्री. नामदेव उबाळे यांनी या विभागाच्या कार्यकारी अभियंता पदावरून अतिशय प्रमाणिक आणि गतीने काम केलेले आहे. त्यांनी गतीने केलेल्या कामामुळेच आज जलजिवन मिशनचा कार्यक्रम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोहचला आहे. या कामाबद्दल त्यांचा सीईओ अजित पवार यांनी स्मृतिचिन्ह देवून गौरव केला. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर या विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार श्री. धाबेकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. आता या विभागाला कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता मिळाले आहेत. जालना जिल्ह्यात कर्तव्य बजावणारे श्री. डाखूरे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्विकारला असून त्यांचे काल सीईओ अजित पवार यांनी स्वागतही केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप काकडे, श्री. उबाळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version