Site icon लोकाशा-बंब न्यूज

शिवसेनेत भूकंप, मंत्री एकनाथ शिंदे 25 ते 30 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये

मुंबई, 21 जून : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे 25 ते 30 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे अनेक आमदार हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. औरंगाबादमधील 6 आमदार हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे.
एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे राज्यातील काही आमदार हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे.  उस्मानाबादेतील शिवसेनेचे उमरगा लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल आहे. आमदार चौगुले हे गेली 3 टर्म सलग सेनेचे आमदार असून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणून ओळख जातात.  सलग 3 वेळा आमदार असतानाही मंत्रिपद न मिळाल्याने चौगुले नाराज होते. चौगुले यांचे दोन्ही नंबर बंद आहे. तर बुलडाण्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमूलकर आणि बुलडाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड नॉट रिचेबल आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार संजय नॉट रिचेबल आहेत.  एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकणमधील २ आमदार सोबत आहे. ठाण्यातील 2 आमदार सोबत आहे, अशी माहिती समोर आली आहे.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला असला तरी आमदार फुटले. त्यामुळे शिवसेनेमध्ये रात्रभर जोरबैठका सुरू होत्या. त्यानंतर अचानक एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समोर आले. त्यानंतर एकनाथ शिंदे थेट गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 25 ते 30 शिवसेनेचे आमदार आहे. धक्कादायक म्हणजे, विधान परिषदेत मतदान सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी आमदारांची जुळवाजुळव  सुरू केली होती. सर्व आमदारांना शिंदेंनी फोन केला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचं समोर आलं आहे. सांघवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचंही समोर आलं आहे.
विधान परिषद निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचं संख्याबळ हे 134 झालं आहे. त्यामुळे भाजप आता अविश्वास ठराव मांडले अशी चर्चा रंगली आहे. पण, त्यासाठी भाजपला आणखी संख्या जुळवावी लागणार आहे. पण, आता एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Exit mobile version