बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक रणनीती आणि धोरण निश्चित करण्यासाठी भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई मुंडे, आ. सुरेश अण्णा धस, माजी आमदार भीमराव धोंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आष्टी- पाटोदा-शिरूर विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक 21 जून रोजी दुपारी 1.00 वाजता लक्ष्मी लाँन्स खडकत रोड,आष्टी येथे आयोजित केली आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हापरिषद, पंचायतसमिती, नगरपरिषद निवडणुकामध्ये भारतीय जतना पार्टीला यश संपादनासाठी लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे स्वत: मतदारसंघ निहाय आढावा घेणार आहेत. प्रत्येक मतदार संघातील लोकप्रतिनिधी, प्रमुख नेते, कार्यकर्ते, पादाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधून निवडणुकीची रणनीती ठरवणार आहेत. या अनुषंगाने 21 जून रोजी दुपारी 1 .00 वा. आष्टी विधानसभा मतदार संघाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्त्यांशी पंकजाताई संवाद साधणार आहेत. तरी आष्टी विधानसभा मतदार संघातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रमुख नेते, कार्यकर्ते, पादाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.