Site icon लोकाशा-बंब न्यूज

प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या पर्यायी मार्ग वापरून सहकार्य करा-आ.संदीप क्षीरसागर,मध्यरात्रीपासून शिवतीर्थ जवळील रस्ता कामास सुरूवात

बीड दि.18(प्रतिनिधी):- शहरातील बायपास-टू-बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून आज मध्यरात्रीपासून शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी महाराज पुतळा सभोवतालच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याने नागरीकांनी,प्रशासनाकडून देण्यात आलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
शहरातील काकु-नाना हॉस्पिटल,जालना रोड ते सोमेश्वर मंदीर,बार्शी रोड पर्यंत एकूण १२ किलोमीटर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.हा रस्ता दोन्ही बाजूंनी पूर्ण होत आला असून आज मध्यरात्रीपासून शिवाजी महाराज पुतळ्या जवळून जाणार्‍या चारही बाजुंच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात येणार आहे.हा शिवाजी महाराज चौक हा शहरातील मध्यवर्ती चौक असून शहरातील मुख्य मार्ग आहे.या रस्ता कामाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण व वाहतूक पोलीस यांच्या वतीने पर्यायी रस्त्याचे नियोजन करण्यात आले असून शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने दिलेल्या पर्यायी रस्त्याचा वापर करून प्रशासनास व चालू कामास सहकार्य करावे अशी विनंती व आवाहन बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.यासोबतच हे काम लवकरात-लवकर करण्याच्या सुचनाही राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांना केल्या असल्याचे आ.क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

Exit mobile version