Site icon लोकाशा-बंब न्यूज

बियाणी कुटुंबात संपत्तीवरून नवे वळण ! बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या संपत्तीवर पत्नीशिवाय आणखी एका महिलेने वारसदार म्हणून केला दावा


नांदेड दि‌ १८ ( लोकाशा न्युज ) :-
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर आता या प्रकरणात नवे वळण समोर आले आहे संजय बियाणी यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण यावरून नवा वाद सुरू झाला आहे, सं बियाणी यांची पत्नी अनिता यांनी आध वारसदार म्हणून न्यायायलात दावा के होता. मात्र, अन्य एका महिलेने यावर आक्षेप घेतला आहे.
या महिलेने आपली चार वर्षाची मुलगी संजय बियाणी यांच्या संपत्तीची वारसदा असल्याचा आक्षेप घेतल्याने बियाणी कुटुंब पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहे. प्रकरणी २४ जून रोजी सुनावणी पार पडणार आहेत. दि. ५ एप्रिल रोजी संजर बियाणींची गोळ्या घालून त्यांच्या घराबाहेर दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती.

संजय बियाणींच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असून पत्नीशिवाय आणखी एका महिलेने वारसदार असल्याचा दावा केल्याने न्यायालयात आता नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी आणि त्यांचा भाऊ प्रवीण बियाणी यांच्या मधील आर्थिक वादही चव्हाट्यावर आला होता. दोघांकडूनही परस्परविरुद्ध तक्रार
पोलिसात दाखल करण्यात आल्यानंतर बियाणी कुटुंबातील अंतर्गत कलहाची चर्चा जोर धरू लागली आहे. अनिता बियाणी यांच्या तक्रारीनंतर प्रवीण बियाणी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी आनंदनगर येथील राज मॉल येथील कार्यालयातून आर्थिक व्यवहार असलेली हार्डडिस्क चोरून नेल्याच्या प्रकरणात प्रवीण बियाणी यांना ३ दिवसांची पोलीस‍ कोठडी मिळाली होती. सध्या ते जामिनावर आहेत. आता संजय बियाणी यांचा वारसदार कोण? यावरून पुन्हा नवा वाद पेटला आहे.
संजय बियाणी यांच्या पश्चात त्यांची पत्न एक मुलगा आणि दोन विवाहित मुली आहेत. खंडणीसाठी गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. आतापर्यंत संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी बारा जणांना अटक करण्यात आली आहे.
बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड पोलिसांन महिन्याभरातच या हत्येचा छडा लावला होता. महाराष्ट्रासह ६ राज्यात व ४ देशात तपास देखील केला होता

Exit mobile version