Site icon लोकाशा-बंब न्यूज

आरोग्यमंत्र्यांच्या प्रशस्तीपत्राने डॉ. वासंती चव्हाण सन्मानित

अंबाजोगाई, दि. १८ (प्रतिनिधी) : परिसरातील लोखंडी येथील मानसिक आजार व वृद्धत्व उपचार रुग्णालयातील भिषक व मधुमेहतज्ज्ञ डॉ. वासंती चव्हाण यांचा कोविड काळातील उत्तम कामाबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – येड्रावकर यांच्या प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात आले.
कोविड काळातील उत्तम कामाबद्दल आरोग्य यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्य मंत्री व आरोग्य राज्यमंत्री यांच्या प्रशस्तीपत्राने सन्मान करण्यात आला. यात डॉ. वासंती चव्हाण यांच्या कोविड काळातील उपचार कार्याची दखल घेत त्यांचाही सन्मान करण्यात आला. कोविडच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात रोज दिड हजारांवर रुग्ण आढळत होते. उपचारासाठी लोखंडीच्या स्त्री रुग्णालयात कोविड रुग्णालय उभारले होते. या रुग्णालयात रोज चारशेंवर रुग्ण उपचार घेत असत. डॉ. वासंती चव्हाण या रुग्णालयात भिषक म्हणून कार्यरत होत्या. या रुग्णालयातील मृत्यूदर जिल्ह्यात सर्वात कमी व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यांच्या कार्याची दखल घेत आरोग्य विभागाने त्यांचा आरोग्य मंत्र्यांचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यापूर्वीही त्यांचा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान झाला होता. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, भाजपचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना आडसकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे, डॉ. चंद्रकांत चव्हाण आदींनी अभिनंदन केले.

Exit mobile version