Site icon लोकाशा-बंब न्यूज

दहावीच्या निकालात जनता विद्यालयाची बाजी, परिक्षेत शाळेचा लागला 98.24 टक्के निकाल, 39 विद्यार्थ्यांनी 92 टक्क्यांहून अधिक मिळविले गुण


बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : इयत्ता दहावीच्या परिक्षेत धारूर येथील जनता माध्यमिक विद्यालयाचा 98.24 टक्के एवढा निकाल लागला आहे. या शाळेतील 39 विद्यार्थ्यांनी 92 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. या परिक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल मुख्याधिपीका सिमा गायकवाड, शरद शिनगारे यांच्यासह इतर शिक्षक आणि कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात धारूर येथील जनता विद्यालयाचे मोठे योगदान आहे. कारण या शाळेतून मिळणार्‍या दर्जेदार शिक्षणामुळे आज अनेक जण मोठ्या पदावर कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळेच या शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असतो. शुक्रवारी जाहिर झालेल्या दहावीच्या निकालातही या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे 39 विद्यार्थ्यांनी 92 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. यामध्ये आर्या जियाजीराव गायकवाड हिने 96.80 टक्के, शंतनू शरद शिनगारे 96.00 टक्के, सृष्टी साशींदर गायके 96.00 टक्के,प्रशांत महादेव चोले 95.60 टक्के, सिध्दी मुकूंद देवकते 95.60 टक्के, मोनिका संजय चोले 95.40 टक्के,रूतूजा सोमनाथ गायके 95.00 टक्के, सानिका भारत 94.60 टक्के,रूतूजा श्रीमंत पवार 94.20 टक्के, साक्षी राजाभाऊ ढगे 94.20 टक्के, प्रीती सुजीत शिनगारे 93.60 टक्के, संपदा अभय जाधव 93.20 टक्के, ज्ञानेश्‍वरी नवनाथ आवटे 93.20 टक्के, आदित्य दत्तात्रय जाधव 93.20 टक्के, प्रणिता प्रकाश शेळके 93.00 टक्के, गौरी सुनिल जोगदंड 93.00 टक्के, आकांक्षा गंगाधर गायके 92.80 टक्के, राधा सोमादेव सुरवसे 92.60 टक्के,साक्षी कल्याण नखाते 92.40 टक्के, सानिका धनंजय शिनगारे 92.40 टक्के आणि प्रांजली माणिक गायसमुद्रे हिने 92.00 टक्के मिळविले आहेत. या विद्यार्थ्यांचे मुख्याधिपीका सिमा गायकवाड, शरद शिनगारे, सहशिक्षक सुरेखा मोरे, बप्पाजी शिनगारे, लिंबाजी शिंपले, लक्ष्मण मंत्री, विजयकुमार मस्के यांच्यासह इतर शिक्षक आणि कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.
Exit mobile version