Site icon लोकाशा-बंब न्यूज

इंजिनिअरींगच्या विद्यार्थास लुटणाऱ्या गुन्हेगारांच्या अवघ्या दोन तासातच मुसक्या आवळल्या ;
संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांची धडाकेबाज कार्यवाही

परळी वैजनाथ दि ‌१६ ( लोकाशा न्युज ) :- अंधाराचा फायदा घेत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यास कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या गुंडाच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी अवघ्या दोन तासातच मुसक्या आवळीत जेरबंद केले. संभाजीनगर पोलिसांच्या ह्या धडाकेबाज कारवाईने गुंडांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक १५ जुन २०२२ रोजी पोलीस स्टेशन संभाजीनगर परळी वै. येथे गणेश परमेश्वर घनोकार वय २१ वर्षे व्यवसाय शिक्षण रा. बेलुरा ता. नांदुर जि. बुलढाणा यांनी तक्रार दिली की, ते दि. १४ जुन २०२२ रोजी १२.०० कोल्हापुर – नागपुर या रेल्वेने परळी येथे दि. १५ जुन २०२२ रोजी १२ वाजनेच्या सुमारास परळी रेल्वे स्थानक येथे पोहचले व अंधार असल्याने ते मध्य रात्री २ ते‌ ४ वा पर्यंत रेल्वे स्थानक येथेच थांबले व ४.३० वाजन्याच्या सुमारास ते रहात असलेल्या केशवराज लॉज कडे चालत जात असताना उड्डाणपुलावर असताना पाठीमागुन एक पांढऱ्या रंगाचे स्कुटीवर तीन इसम आले व त्यानी गणेश यास थांबण्यास सांगितले व त्याच्यातील एका इसमाने त्याच्या जवळील कोयता काढला व धमकावुन तुझ्या जवळचे पैसे काढ असे म्हणाल्याने त्याने भितीने त्याच्या खिशातील पॉकेट काडुन ७००/- रुपये दिले. त्यानंतर दुसऱ्या इसमाने त्याच्या खिश्यातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला व त्यांनतर तिघांनि त्याला जबरदस्तीने स्कुटीवर बसवुन आय सी आय सी आय बँकेच्या एटीएम मध्ये घेवुन गेले त्यांच्या पॉकेट मधील एटीएम कार्ड जबरदस्तीने काढुन मारहाण करुन पिन सांगायला लावुन त्याच्या वडीलांचे अकाऊट मधील १५००/- रुपये काढुन घेतले व त्याला परत स्कुटीवर बसवुन बसस्टैंड जवळ मारहाण करुन सोडुन निघुन गेले. सदर घटने बाबत गणेश यांने पो.स्टे. संभाजीनगर परळी वै. येथे येवून कळवले व पोलीस तक्रार घेत असतांना गणेशची परीक्षा असल्याने तो पेपर देवुन आल्यावर मी पोलीस स्टेशनला येवून सविस्तर तक्रार देतो म्हणुन गेला व परिक्षा संपल्या नंतर पोलीस स्टेशनला येवुन संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांना झाला सर्व प्रकार सांगत तक्रार दिल्या वरुन पो.स्टे. संभाजीनगर परळी वै. येथे गु.र.न. १२०/२०२२ कलम ३६५, ३९२, ३४ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, यांनी सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवून तात्काळ तक्रार दाखल होताच सपोनि नारायण गित्ते, पोउपनि चांद मेंढके, डीबी शाखेचे सफौ व्यंकट भताणे, सचीन सानप, पोना/शिंदे, पोना/पठाण, पोकों/दुर्गे यांच्या दोन पथके तयार करुन एक पथक तक्ररारदार यास सोबत घेवून सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यास व एक पथक रेकॉर्डवरील गुन्हेगार शोधणेसाठी रवाना केल्या.
तक्रारदार यांने दाखवलेल्या आय सी आय सी आय बँकेच्या एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज पाहुन डीबी शाखेचे कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी सचीन सानप यांनी त्यातील एका अरोपीस ओळखले वरुन तक्रारदारास पो.स्टे. ला सोडुन ते सदर अरोपीच्या मागावर जावुन त्यास अवघ्या १५ मिनटातच त्याच्या मुसक्या आवळल्या आणि ताब्यात घेतले त्यानंतर परत पथकाने जावुन इतर दोन अरोपी यांना एक तासात ताब्यात घेत मुसक्या आवळीत जेरबंद केले. अरोपीना कसोशीने व बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.
तसेच तपासा मध्ये वेग यावा म्हणुन पो.नी. सुरेश चाटे यांनी सफौ आयटवार, पोलीस जमादार होळंबे, पोह/देशमुख, पोना / अचार्य यांचे ही एक पथक बनवुन तपासाला गती दिली त्यामुळे गणेश घनोरकर या गुरुगोविंदसिंग कॉलेज नांदेड येथे इलेक्ट्रीकल इंजेनरीगच्या तिसर्या वर्षात शिकणाऱ्या व परिक्षेसाठी एंन्ट्रनशिपची परिक्षा देण्यास थर्मल पावर स्टेशन येथे अलेल्या विद्यार्थास लुटणाच्या गुन्हेगाराना अवघ्या दोनतासात पोलीसांनी पकडुन गजाआड केले.
ही कार्यवाही बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अंबाजोगाई विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक सुनिल जायभाये यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या ह्या धडाकेबाज कारवाईमुळे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, सपोनि नारायण गित्ते, उपनिरीक्षक चांद मेंडके, डीबी शाखेचे व्यंकट भताने, सचीन सानप, दुर्गे, शिंदे, पठाण आदींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version