परळी वैजनाथ दि १६ ( लोकाशा न्युज ) :- परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी आपल्या धडाकेबाज कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला असून काल मध्यरात्री मोठी धाडसी कारवाई करीत गस्ती दरम्यान अवैध दारू सह जवळपास १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करीत तिघांच्या मुसक्या आवळीत जेरबंद केले. ही धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने आणि टिमने केली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, परळी शहर पोलिस ठाण्याचे धडाकेबाज कारवाया करण्यात सक्षम असलेले डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परळी – अंबाजोगाई रोडवर बायपास चौक येथे पांढऱ्या रंगाची कार संशयास्पदरित्या उभी केलेली आढळून आली. सदरील ठिकाणी असलेले पीक अप व कार याची तपासणी केली असता पीक अप मध्ये केवळ गोवा राज्यात विक्रीची परवानगी असलेली प्रतिबंदीत दारू आढळून आली. ज्या मध्ये मॅकडॉल कंपनीच्या १,०७,५२०/- रुपयांच्या १६८० सिलबंद बाटल्या, इम्पेरीयल ब्लु कंपनीच्या ६१,४४०/- रुपयांच्या ९८० बाटल्या, रॉयल स्टॅग कंपनीच्या १९,२००/- रुपयांच्या २४० बाटल्या, ५,५०,०००/- रुपयांची एक पांढऱ्या रंगाचे महीद्रा मॅक्स पिकअप क्र. एम एच -२५ -पी -०२०९, तसेच ४,००,०००/- रुपयांची स्विफ्ट डिझायर कार क्र एम एच-४६-एडी-५६०३ असा मुद्देमाल व वाहन जप्त करीत मोठी धाडसी कारवाई मध्यरात्री गुरुवार रोजी पहाटे २ च्या सुमारास बाय-पास चौक अंबाजोगाई रोडवरकेली. या कारवाईत दत्तात्रय भिकाजी वाघमारे ( वय ४४ रा. रत्नापुर पो. येरमाळा जि. उस्मानाबाद), व्यकटेश नागनाथ गंजेवार (वय २२ रा. मंगळवार पेट अंबाजोगाई), रोहन राजाभाऊ जाधव वय २२ रा. भगवान बाबा चौक अंबाजोगाई ता. अंबाजोगाई) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मध्यरात्री करण्यात आलेली ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भार्गव सपकाळ, सपोनि गोस्वामी, डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, घटमल, पोना. लोहबंदे, पांचाळ, प्रल्हाद भताने यांनी केली असून या प्रकरणी ठाण्याचे कर्मचारी प्रल्हाद भताने यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कलम ४२०, ३४ भादवि सहकलम ६५ ई म. प्रो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांनी केलेली ही धडाकेबाज कारवाई बहुदा बीड जिल्ह्यात अवैध दारू विरुद्ध केलेली मोठी कारवाई असेल. या कारवाईमुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, सपोनी भार्गव सपकाळ, सपोनी गोस्वामी, डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, प्रल्हाद भताने, घटमल, लोहबंदे, पांचाळ आदींचे अभिनंदन होत आहे. धडाकेबाज कारवाईमुळे परळी शहर आणि परिसरात अवैध दारूचे धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्यावर ही कारवाई होणार असल्याचे समजते.