ुबीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : बीडच्या रिक्त असलेल्या पोलीस अधीक्षकपदी अखेर नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड येथील मानवी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक असलेल्या नंदकुमार ठाकूर यांना बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. आर.राजा यांची बदली झाल्यानंतर महिनाभरापासून हे पद रिक्त होते. सध्या या पदाचा अतिरिक्त पदभार पंकज देशमुख यांच्याकडे होता. देशमुख यांनी बीड पोलिस अधीक्षक पदाचा पदभार अत्यंत चांगल्या पध्दतीने संभाळला. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळातच 309 पोलिस कर्मचार्यांच्या प्रशासकिय बदल्या झाल्या. त्यांनी केलेल्या या बदल्यांवर सर्वच कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले. आता नंदकुमार ठाकूर यांची बीड पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते येत्या दोन दिवसात पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारणार आहेत.
एसपी नंदकुमार ठाकूर यांचा कर्तव्यदक्षपणा बीड जिल्ह्याच्या कामी येणार, हायप्रोफाईल केसवर काम करण्याचा आहे ठाकूर यांचा अनुभव, मुंबईत गाजलेल्या सोशल मीडिया फेक लाईक केसवर ठाकूर यांनी केले होते काम, केसमध्ये बॉलिवूडमधील अनेक आसामी होत्या आरोपी, मुंबईतीलच अर्णव गोसावीशी संबंधित टीआरपी घोटाळ्याचाही ठाकूर यांच्याकडेच होता तपास
