Site icon लोकाशा-बंब न्यूज

पाच हजाराची लाच घेताना विस्तार अधिकारी रोडेवाडला पकडले, माजलगावात एसीबीची कारवाई


माजलगाव, दि. 6 (लोकाशा न्यूज) : माजलगाव पंचायत समितीचा विस्तार अधिकारी तथा प्रभारी सहायक गटविकास अधिकारी रामचंद्र होनाजी रोडेवाड यास सोमवारी पंचायत समिती आवारात लिपिक पदावर कार्यरत कर्मचार्‍यांचे जेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले.
तालुक्यातील ग्रामपंचायत केसापुरी येथील लिपिक पदावर कार्यरत कर्मचारी याचे 10 वर्ष पूर्ण झालेले असल्याने सेवा जेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद बीड यांना पाठवून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष 10 हजार लाचेची मागणी करून तडजोडीत 5 हजार रुपये घेण्याची मान्य करून सोमवारी ते पैसे स्वीकारताना रोडेवाड यास रंगेहाथ पकडले.त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल धस,भरत गारदे, श्रीराम गिराम,अमोल खरसाडे,अविनाश गवळी यांनी केली.

Exit mobile version