बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळा सोडता सर्वच ऋतूमध्ये रात्रंदिवस पायपीट ठरलेली उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी तासन तास टँकरची वाट पाहणारे ग्रामस्थ तर नळावरची किंवा विहीर आडावर नंबर लावत रात्रभर पाणी काढणारी माणसं अशीच परिस्थिती साधारण सर्वच गावांमध्ये आहे. मात्र बीड जिल्ह्यात स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत एकही नळ योजना नसलेल्या शंभर गावांमध्ये जिल्हा जीवन मिशन अंतर्गत 100 टक्के नळ जोडनी देण्यासाठी विविध उपक्रम सुरू झालेले आहेत, शंभर पैकी 64 गावांचे आराखडे तयार झाले असून पंचवीस गावानी ई निविदा प्रसिद्ध केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यात तेराशे 67 गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत 55 लिटर प्रति व्यक्ती दर दिवशी शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी आराखडे तयार करण्याचे काम एकाच वेळी सुरू आहेत. बाराशे 67 गावांमध्ये दरडोई चाळीस लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्वजलधारा जलस्वराज्य भारत निर्माण राष्ट्रीय पेयजल विशेष घटक आमदार खासदार फंड तसेच नरेगा 14 वा व 15 वा वित्त आयोग अशा विविध योजनेतून गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्व योजना आता दुरुस्ती मधून जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट झालेले आहेत तर योजना नसलेल्या 100 गावांमध्ये पिण्याचे पाणी देणे व शंभर टक्के कुटुंबांना नळजोडणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचे आव्हान पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने स्वीकारले आहे. दरडोई जास्तीचा खर्च होणार्या या गावांमध्ये यापूर्वी तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठा योजना करता आलेल्या नाहीत अशा सर्व योजनांचा समावेश जलजीवन मशीन मधून करण्यात आलेला आहे
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनी सर्व अडचणी सोडवून या गावांना नळाने पाणी मिळणार आहे त्यामुळे या गावातील ग्रामस्थांचा आनंद शिगेला पोहोचला आहे. अकरा तालुक्यांमधील विखुरलेल्या या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जनजागृती करणे नळ योजनेची माहिती ग्रामस्थांना देणे त्यासाठी लागणार्या लोकवर्गणी व देखभाल दुरुस्तीची जाणीव या लोकांना करून देण्याकरिता सुलभिकिकरणाचे काम जिल्हास्तर व पंचायत समिती स्तरावरून करण्यात आलेले आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक श्री प्रदीप काकडे यांनी दिली आहे. जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा पाच उपविभाग आहे त्यांच्या मदतीने सर्व गावांचे केंद्र शासनाच्या कोबो टूल पद्धतीनुसार 1267गाव कृती आराखडे व आर्थिक आराखडे तयार केले त्या आराखडा मधून दुरुस्ती सुचवलेली आहे तर शंभर गावापैकी 67 गावांनी आराखडे तयार केले असून नवीन योजनांची मागणी केली आहे. त्यापैकी 25 गावांनी मंजूर केलेल्या कामाच्या ई निविदा मागवून काम सुरू केले आहे स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव वर्षा निमित्ताने या गावात पिण्याचे पाणी नळाने पोचणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे. बीड जिल्हा दुष्काळी व टँकर असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो जल जीवन मिशन मध्ये समावेश झालेल्या सर्व गावात नळाने शुद्ध पाणी पोचविण्यासठी जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं पंचायत समिती गटविकास अधिकारी सांगत आहे.