Site icon लोकाशा-बंब न्यूज

सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक
धोडींराम इंगोले यांचे निधन


बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : आहेर धानोरा (ता.बीड) येथील रहिवाशी सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक धोडींरामजी पाटीलबुवा इंगोले यांचे रविवारी दुपारी औरंगाबाद येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 90 वर्षे होते. त्यांनी पाटोदा, युसूफ वडगाव, धारूर, गेवराई, घनसांगवी आणि भायखळा याठिकाणी सेवा दिली. मागच्या 28 वर्षांपुर्वी ते पोलिस खात्यातून सेवानिवृत्त झाले. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते, त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि प्रमाणिक भावनेने पोलिस खात्यात कर्तव्य बजावले, त्यामुळेच त्यांची पोलिस खात्यात प्रतिमा उंचावलेली होती. रविवारी सायंकाळी आहेर धानोरा येथील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, जावाई, नातवंडे असा परिवार असून ते लघु पाटबंधारे उपविभाग केजचे सेवानिवृत्त हजेरी सहाय्यक भगवान नखाते यांचे सासरे होतं. इंगोले कुटूंबियांच्या दु:खात दै. लोकाशा आणि बंब परिवार सहभागी आहे.

Exit mobile version