बीड, दि. 02 (जि. मा. का.) : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक - 2022 प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यानुसार जिल्हा परिषद निवडणूक विभाग व जिल्हयातील सर्व पंचायत समिती निर्वाचन गणांची प्रारुप प्रभाग रचना दि. 02.06.2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम, 5 चे कलम 58 पोटकलम (1) नुसार जिल्हा परिषद निवडणूक विभाग उक्त पंचायत समितीमध्ये समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणाच्या अधिसूचना परिशिष्ट 3 व परिशिष्ट 3 (अ) नुसार प्रसिध्दीस देण्यात आल्या आहेत.
ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, संबंधित पंचायत समिती कार्यालय येथील नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली असून, त्या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या प्रारूप प्रभाग रचनेस जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती सूचना सादर करण्यासाठी 8 जूनपर्यंत मुदत आहे. तरी आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्या संबंधीची जी सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना उपजिल्हाधिकारी (सामान्य) बीड यांचेकडे दि. 8 जून 2022 पर्यंत सादर कराव्यात. वरील तारखेनंतर उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांच्याकडे आलेली निवेदने, हरकती, सूचना इत्यादि विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) बीड यांनी कळवले आहेत.
-------