Site icon लोकाशा-बंब न्यूज

गावठी कट्टा विक्री करणार्‍याला पकडले, गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे केली जप्त, एलसीबीची अंभोरा ठाण्याच्या हद्दीत कारवाई


बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : गावठी कट्टा विक्री करणार्‍याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये करण्यात आली असून यावेळी एक गावठी कट्टा आणि तीन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
रविवारी दुपारी दिड वाजता धामणगाव  ते पाथर्डी रोडवर बंद असलेला  रायबा धाब्याच्या समोर  इसम नामे दिपक विष्णू मुंगशे (वय 21 वर्ष रा. देडगाव ता . नेवासा जिल्हा अहमदनगर) हा गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती. सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व 03 जिवंत काडतुसे मिळून आले आहेत. सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन अंभोरा येथे गुर न.90/2022 कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे  गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार स्थनिक गून्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदरशनाखाली एलसीबीचे पोलीस उप निरीक्षक श्री संजय तुपे, पो. ह. कैलास ठोंबरे, पोलिस निरीक्षक अशोक दुबाले, गणेश हांगे, पो ह नशीर शेख, चालक संपत तांदळे यांनी केली आहे.

Exit mobile version