Site icon लोकाशा-बंब न्यूज

उद्या पंकजाताईं नारायण गडावर, नारायण गडावरील महंतांच्या निवास वास्तूचे होणार पूजन, भाविक भक्तांनी मंगल सोहळ्यास उपस्थित राहावे : राजेंद्र मस्के


बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : महाराष्ट्राची धाकटी पंढरी व बीड जिल्ह्याचे अध्यात्मिक वैभव श्री क्षेत्र नारायण गडावर मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांच्या नूतन भव्य निवास वास्तूचे पूजन भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या शुभ हस्ते. आज दुपारी 12.30 वा. संपन्न होणार आहे. या भव्य मंगल सोहळ्यास नारायण गड परिसरातील भाविक भक्तांनी बहु संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

श्री क्षेत्र नारायण गड लाखो भाविक भक्तांचे श्रद्धा स्थान असून, गडावर सातत्याने भाविकांची वर्दळ असते.नारायण गडावर मुलभूत सोयी सुविधा, आणि गडाच्या सुशोभीकरणासाठी तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी विकास कामासाठी 25 कोटी भरीव निधी दिला होता. या निधी अंतर्गत अनेक कामे प्रगती पथावर आहेत. ग्रामविकास खात्या अंतर्गत गडाला जोडणार्‍या रस्ता सुधारणा कामासाठी हि निधी दिला. भक्तांच्या मागणीनुसार गडाचे महंत प.पु.शिवाजी महाराज यांना राहण्यासाठी सुंदर वास्तू उभारण्यात यावी यासाठी 75 लाख रूपयांचा निधी पंकजाताईंनी दिला. आज गडावर भव्य वास्तू उभारण्यात आली आहे. या नुतन वास्तूचे पूजन आज दि. 27 मे 2022 रोजी दुपारी 12.30 वा. श्री क्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती महंत प.पू. शिवाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या शुभहस्ते व भक्तगणांच्या साक्षीने संपन्न होणार आहे. या मंगलमय सोहळ्यास नारायण गड परिसरातील भाविक भक्त गण, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बहुसंखेने उपस्थित राहावे. असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
Exit mobile version