Site icon लोकाशा-बंब न्यूज

भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव, हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला


अंबाजोगाई(प्रतिनिधी)-शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष्य लागलेल्या भाशिप्र संचालक पदाच्या निवडणुकीत अखेर संघ व्यवस्था रचनेतुन आलेल्या संस्था उत्कर्ष पॅनलने बाजी मारत प्रा.सतिश पत्की, पंजाब मस्के गटाचा दणदणीत पराभव केला. 20 पैकी 19 जाग्यावर हिर्‍याने चकाकी घेत उत्कर्ष झाला तर दुसरीकडे या संस्थेत व्यक्तिविचार चालत नाहीत, घराणेशाहीला थारा मिळत नाही. संस्था संकेतानुसार चालते हे मतदारांनी दाखवुन दिले. संघ विचाराच्या पलीकडे जावुन स्वअस्तित्वासाठी काही करण्याचा प्रयत्न केला तर अशा हटवादींना परिवारातील व्यवस्था खड्यासारखे कसं बाजुला टाकते? हे पण दिसुन आलं.
मुळात या संस्थेची निवडणुक प्रक्रिया मतदार सभासदांना मान्य नव्हती. कारण ही संस्था व्यक्तिविचाराने नव्हे तर संघ व्यवस्थेच्या संकेतानुसार चालते हा आजवरचा इतिहास म्हणावा लागेल. मात्र व्यवस्थेच्या प्रक्रियेला छेद देण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला. म्हणून यंदा संचालक पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. सत्ताधारी विरूद्ध पत्की-मस्के गट अटीतटीचा सामना झाला. निवडणुक पुर्व रंगात सत्ताधारी पॅनलला अनेक संकटाला तोंड द्यावे लागले. सत्तेचा वापर विरोधकांनी करत न्यायालयीन लढाया जिंकल्याच्या आनंदावर ही निवडणुक सहज जिंकु या आविर्भावात विरोधक होतेच. मात्र संघ व्यवस्था शुद्ध कर्मावर आधारित असते. ईश्वराच्या पुण्याईवर आपण निवडणुक जिंकु अशी प्रतिक्रिया निवडणुक प्रक्रियेचे प्रमुख विद्यमान कार्यवाह नितीन शेटे यांनी अनेकदा बोलुन दाखविली होती. बिनविरोध व्हावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण विरोधकांना पडलेली स्वप्न रात्रीची होती हे आता सिद्ध झाले. संस्थेत व्यक्तिविचार घुसवण्याचा प्रयत्न अखेर सभासदांनीच हाणुन पाडला. कडवा सामना झाला हे निश्चित आहे. कारण विरोधकांच्याकडे तत्कालीन काळात वाढवलेल्या स्वविचाराच्या सभासदांची शिदोरी होती. या बळावर सहज जिंकुन येवु अशा प्रकारचा आशावाद होता. दुसरीकडे संघ व्यवस्थेतुन पुढे आलेला संस्था उत्कर्ष पॅनल यांनी दिलेले उमेदवार शिवाय संघ कार्यकर्त्यांनी घेतलेली कठोर मेहनत ज्यामुळे विरोधकांचे डाव उधळुन टाकता आले. आरोप-प्रत्यारोपाने रंगलेली निवडणुक अखेर सत्य परेशान है, लेकिन पराजित नही होता इथपर्यंत येवुन पोहोचली. रविवारी खेळीमेळीच्या वातावरणात दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर लगेच निर्वाचन अधिकारी श्री बी.डी.सावंत यांनी मतमोजणी प्रक्रिया पुर्ण करून निकाल जाहिर केला. 20 जागांपैकी 02 जागा अगोदरच सत्ताधारी गटाच्या बिनविरोध आल्या होत्या. ज्यात श्री आडे गुरूजी आणि विष्णुपंत सोनवणे यांचा समावेश होता. उरलेल्या 18 पैकी केवळ 01 जागा अविनाश तळणीकरच्या रूपाने पत्की गटाला मिळाली. प्रविण सरदेशमुख, जितेश चाप्सी, राम कुलकर्णी या गटात विजय झाले. सर्वसाधारण गट अटीतटीची निवडणुक झाली. अखेरच्या क्षणी सर्वच्या सर्व जागा, 1) डॉ.सुरेंद्र आलुरकर, 2) सत्यनारायण लोहिया, 3) डॉ.हेमंत वैद्य, 4) डॉ.कल्पनाताई चौसाळकर, 5) शंकरराव आप्पा लासुणे, 6) माणिकराव भोसले, 7) विजयराव चाटुफळे, 8) अमरनाथ खुरपे, 9) विष्णुपंत कुलकर्णी, 10) सौ.ज्योती ठाकुर, 11) प्रकाश दुग्गड आदींचा समावेश आहे. शिक्षण सेवक गटात आप्पा यादव यांचा विजय तर शिक्षक प्रतिनिधी म्हणुन उमेश जगताप आणि संजय गुरव विजयी झाले. मतमोजणी रात्री 2 वाजेपर्यंत सुरू होती. पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निकाल लागल्यानंतर रात्रीच्या अंधारात सत्ताधारी गटाच्या सर्वच्या सर्व जागा आल्यानंतर हिर्‍याची चकाकी अधिक वाढली. रूपांतर प्रकाशमय होवुन संस्था इतिहासात खरा उत्कर्ष आणि इतिहास घडल्याची चर्चा सुरू होती.

Exit mobile version