Site icon लोकाशा-बंब न्यूज

मुंडे भगिनींच्या प्रयत्नाने वारणी येथे ग्रामीण रुग्णालयाचे काम होणार सुरू


बीड, दि.19 (लोकाशा न्युज) ः  शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथे पंकजाताई मुंडे व खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असुन लवकरच भव्य दिव्य इमारत उभारणी करण्यात येणार असल्याने परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेण्यासाठी पंकजाताईसाहेब मुंडे व खासदार प्रितमताई मुंडे यांनी विशेष प्रयत्न करुन हे रुग्णालय मंजूर करून घेऊन आता मौजे वारणी येथे ग्रामीण रुग्णालयाची भव्य दिव्य इमारत होणार आहे. त्यासंदर्भात आरोग्य आयुक्तालय महाराष्ट्र शासन यांनी सदरील ग्रामीण रुग्णालयास तात्काळ मंजुरी देऊन तात्काळ ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभारण्याचे आदेश दिले आहेत तसेच मौजे वारणी येथील गट नंबर 259 मधील पाच एक्कर जागेवर बांधकाम करण्याचे आदेश दिले आहेत. ही ग्रामीण रुग्णालयाची इमारत मंजूर करून घेण्यासाठी पंकजाताईसाहेब मुंडे व खासदार प्रितमताई मुंडे यांच्या आदेशाने आरोग्य मंञी राजेश भैय्या टोपे यांच्या कडे जिल्हा परिषद सदस्य रामराव खेडकर, जिल्हा परिषद सदस्य रामदास नाना बडे, राजाभाऊ केदार, भास्कर केदार, माजी सभापती बाबुराव केदार, डॉ अनिल बडे यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे वारणी ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळुन लवकरच रुग्णालयाची भव्य दिव्य वास्तू रुग्णांच्या सेवेत उभी राहणार आहे.

Exit mobile version