Site icon लोकाशा-बंब न्यूज

मध्यप्रदेश भाजपाची भोपाळमध्ये महत्त्वपूर्ण बैठक ; पंकजाताई मुंडेंची उपस्थिती,राज्यातील आगामी निवडणूका, संघटनात्मक बाबींवर बैठकीत चर्चा

भोपाळ ।दिनांक १६।
मध्यप्रदेशात आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणूकांबाबत पक्षाची रणनिती ठरविण्यासाठी प्रदेश भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक आज भोपाळमध्ये पार पडली. भाजपच्या सह प्रभारी तथा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची या बैठकीस विशेष उपस्थिती होती.

भोपाळ येथील प्रदेश कार्यालयात आज भाजपची बैठक संपन्न झाली. सर्व प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. बैठकीस उपस्थित राहण्यासाठी पंकजाताई मुंडे आज सकाळीच भोपाळमध्ये दाखल झाल्या. राजा भोज विमानतळावर त्यांचे जिल्हाध्यक्ष सुमित पचौरी, प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती सिमा सिंह व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. दुपारी बैठकीला दीप प्रज्वलनाने सुरवात झाली. महानगरपालिका, नगरपरिषद तसेच पंचायत निवडणुकांची पक्षाची रणनिती तसेच संघटनात्मक बाबींवर बैठकीत चर्चा झाली. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी मार्गदर्शनही केले.

बैठकीस प्रभारी पी मुरलीधर राव, सह प्रभारी पंकजाताई मुंडे, प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा, संघटन सरचिटणीस हितानंद शर्मा, माजी मंत्री उमाशंकर गुप्ता आदींसह वरिष्ठ नेते उपस्थित होते.
••••

Exit mobile version