Site icon लोकाशा-बंब न्यूज

मुकादमाच्या जाचास कंटाळून ऊसतोड मजुराची आत्महत्या, सिरसाळा ठाण्यात गुन्हा दाखल

 परळी तालुक्यातील जयगाव येथील घटना 

सिरसाळा न्यूज  : ऊसतोडीच्या हिशोबावरुन मुकादमाच्या जाचास कंटाळून मजुराने आत्महत्या केल्याची घटना जयगाव ता.परळी येथे घडली आहे. भगवान श्रीरंग शिंदे वय ४० रा.ढोरगाव ता.माजलगाव असे मयत मजुराचे नाव व पत्ता आहे. गंगाखेड शुगर कारखान्या करिता हा मजूर आपल्या पत्नी सह ऊसतोडणी करत होता. संजय शिंदे रा.जयगाव ता.परळी हा त्यांच्या टोळीचा मुकादम होता.टोळीवर सतत खटकत असल्याने दोन महिण्या पुर्वीच भगवान शिंदे व त्यांची पत्नी गावी वापस आले होते. त्यांच्या कडे फिरलेला हिशोब घेण्यासाठी मुकादम संजय शिंदे, विजयकुमार गडदे, आसाराम शिंदे, गोटू आसाराम शिंदे यांनी त्यांच्या ढोरगावी दिनांक १० मे रोजी जाऊन भगवान शिंदे यांना फिरलेले पैसे मागितले, भगवान शिंदे यांनी हिशोब करुन चार दिवसात देण्याचे सांगितले पंरतु मुकादम व त्याचे सहकारी यांनी न ऐकता थेट ऊसतोड मजूर शिंदे यास मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करुन मोटारसायकल वरुन भगवान शिंदे यांना जयगाव ( ता.परळी)येथील एका शेतातील आखाड्यावर आणले आणि त्या ठिकाणी दोन दिवस जाच/त्रास/छळ केला. यास कंटाळून भगवान श्रीरंग शिंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिनांक १२ मे रोजी हा प्रकार उघडकीस आला, घटना समजताच मयताची पत्नी मुक्ताबाई व नातेवाईक त्या ठिकाणी आले. घडला प्रकार सिरसाळा पोलीसाना सांगितला. दिलेल्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात कलम ३०६ , ३६५,३२३ ,३५ भादवी सह ॲट्राॅसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत करत आहेत.

Exit mobile version