Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्ह्यातील रस्त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी खा. प्रीतमताई गडकरींना भेटल्या, लातूर-अंबाजोगाई रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्‍न तातडीने मार्गी लागणार


बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यातील रस्त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी खा. प्रीतमताई मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत जावून भेट घेतली. सर्वात महत्वाचे म्हणजे लातूर-अंबाजोगाई रस्त्याच्या चौपदरीकरणाचाही प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार आहे. यासाठी खा. प्रीतमताईंनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपला पाठपुरावा सुरू केला आहे.
गुरूवारी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची खा. प्रीतमताईंनी दिल्लीत भेट घेतली, त्यांनी यावेळी बीड जिल्ह्यातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग विषयक प्रश्नांबाबत त्यांना यावेळी अवगत केले. याभेटीत लातूर ते अंबाजोगाई दरम्यान असलेल्या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा विषय त्यांनी प्राधान्याने गडकरींसमोर मांडला. या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे आवश्यक अंतरात रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येईल, असा सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला. तसेच रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील संबंधित विभागाला दिल्या आहेत. अपघात प्रवण क्षेत्राची खा. प्रीतमताइर्ंनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर वाढते अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या, एकीकडे ताई नितीन गडकरी यांची चौपदरीकरणासाठी भेट घेत असताना दुसरीकडे या मार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रादरम्यान तात्काळ तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी खा. प्रीतमताई पाठपुरावा करत आहेत,लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यश येईल हा विश्वास आहे.आपण सर्वांनी या मार्गावर प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन करावे व काळजी घ्यावी, असे आवाहन खा. मुंडेंनी केले आहे.

Exit mobile version