Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडेंनी मुस्लिम बांधवांना घरोघरी जाऊन केले “ईद मुबारक”,महिला अन् तरूणांमध्ये प्रचंड उत्साह ; प्रभागातील समस्याही जाणून घेतल्या,पंकजाताईंच्या पाठिशी खंबीरपणे उभा रहाण्याचा समाज बांधवांचा दृढनिश्चय!

परळी । दिनांक ०९।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी काल शहरातील मुस्लिम बांधवांना घरोघरी जाऊन रमजान ईद सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. या भेटीवेळी मुस्लिम समाजातील महिला आणि युवा वर्गात मोठा जोश आणि उत्साह होता. आतापर्यंत आम्ही ताईंच्या पाठिशी नव्हतो पण आता त्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभा राहून त्यांना ताकद देणार आहोत असा दृढनिश्चय त्यांनी बोलून दाखवला.

पंकजाताई मुंडे यांनी रविवारी दिवसभर शहरातील बुथ प्रमुखांच्या बैठका घेतल्यानंतर संध्याकाळी मुस्लिम बांधवांना घरोघरी जाऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या परिवारासमवेत शिरखुर्म्याचा आस्वादही घेतला. मलिकपुरा भागातील सय्यद बाॅडीबिल्डर, आशफाक मौलाना, अखिल सर, शेख इकबाल (पेठ मोहल्ला), खय्युम भाई ( बंगला गल्ली), शेख यासिन (बरकत नगर), सलाऊद्दीन काकर (काकर मोहल्ला), इमरान खान ( आझादनगर) आदींच्या घरी जाऊन पंकजाताईंनी त्यांच्या परिवाराला व उपस्थित समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.

गर्दी, जोश आणि दृढनिश्चय

पंकजाताई काल ज्या ज्या भागात भेटीसाठी गेल्या होत्या, तिथले सर्वच रहिवाशी बांधव त्यांच्या स्वागतासाठी एकत्र आले होते. महिला व युवा वर्गाने तर मोठी गर्दी यावेळी केली होती, त्यांच्यामध्ये जोश व प्रचंड उत्साह पहायला मिळाला. पंकजाताईंनी प्रत्येकाला वेळ देत ईदच्या वैयक्तिक शुभेच्छा दिल्या. प्रभागातील रहिवाशांनी यावेळी नागरी समस्या आणि नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभाराचे गाऱ्हाणे त्यांचेसमोर मांडले. आतापर्यंत आम्ही तुमच्या पाठिशी नव्हतो याची आम्हाला जाणीव होत आहे, यापुढे खंबीरपणे पाठिशी राहू असा दृढनिश्चय मुस्लिम बांधवांनी ठिक ठिकाणी बोलून दाखवला. भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, डाॅ. शालिनी कराड, उमेश खाडे, शेख अनीस आदी यावेळी उपस्थित होते.
••••

Exit mobile version