Site icon लोकाशा-बंब न्यूज

दौनापूरच्या हरिनाम सप्ताहात पंकजाताई मुंडेंचा दिसला असाही साधेपणा,जमिनीवर बसून भाविकांसोबत घेतला महाप्रसाद

परळी ।दिनांक ०८।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा जनतेला पहावयास मिळाला. अखंड हरिनाम सप्ताहात सर्व सामान्य भाविकांसोबत जमिनीवर बसून त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन सर्वांना सुखद धक्का दिला.

झाले असे की, तालुक्यातील दौनापूर येथे ग्रामस्थांच्या वतीने १ मे पासून श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आज सप्ताहाच्या समारोप प्रसंगी दुपारी व्याकरणाचार्य ह.भ.प. अर्जून महाराज लाड यांचे काल्याचे किर्तन होते. पंकजाताई मुंडे यांना गावकऱ्यांनी आवर्जून कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. पंकजाताईंनी सप्ताहात हजेरी लावली आणि धार्मिक मार्गदर्शनही केले. ग्रामस्थांनी महाप्रसादासाठी त्यांची विशेष व्यवस्था केली होती परंतू त्यांनी सर्व भाविकांसोबत सार्वजनिक पंगतीत बसणे पसंत केले आणि सर्वांसोबत महाप्रसाद घेतला. यापूर्वी देखील हाळमच्या सप्ताहात त्यांचा असाच साधेपणा अनुभवास आला होता. नेतेपदाचा कुठलाही बडेजाव न करता पंकजाताईंचा हा साधेपणा उपस्थित भाविक भक्तांना पुन्हा एकदा सुखावून गेला.
••••

Exit mobile version