मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये परळीच्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश दिला आहे..जामीन घेतल्यानंतरही सतत कोर्टामध्ये गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हा आदेश दिला आहे.. यापूर्वी 10 फेब्रुवारीला कोर्टाने अटक वॉरंट काढले होते आणि 13 एप्रिल पर्यंत कोर्टात हजर राण्या संदर्भात सांगितले होते मात्र राज ठाकरे हे 13 एप्रिलपर्यंत कोर्टात हजर न झाल्याने पुन्हा दुसऱ्यांदा परळी कोर्टाने राज ठाकरे यांना अटक वॉरंट काढले आहे.
राज ठाकरे यांच्याविरुद्ध परळी न्यायालयाचे पुन्हा अजामीनपात्र वॉरंट
