Site icon लोकाशा-बंब न्यूज

15 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली, दि.4 : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांमुळे न्यायालयीन प्रक्रीयेत अडकलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि मनपा निवडणुका पुढील 15 दिवसात जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय आता राज्यात निवडणुका होणार आहेत.

मार्च 2020 च्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेशात म्हटले आहे. जवळपास 14 महानगर पालिका आणि 25 जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदा निवडणुका या आरक्षणामुळे लांबणीवर पडलेल्या आहेत.
यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले सुप्रीम कोर्टाचा निकाल हातात पडल्यानंतर या निकालात नेमकं काय म्हटलं आहे हे समजून येईल. ज्या निवडणुका पुर्वी जाहीर झाल्या होत्या त्याच निवडणुकांसंदर्भात हा आदेश आहे की संपूर्ण हे निकालपत्र हातात आल्यावरच समजेल, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version