Site icon लोकाशा-बंब न्यूज

लातुर-बर्दापूर-अंबाजोगाई रस्त्याची खा.डॉ.प्रितमताईं मुंडे उद्या स्पॉट पाहणी करणार


अंबाजोगाई(प्रतिनिधी)-लातुर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर बर्दापुर फाट्यावर सतत होत असलेल्या अपघाताची गंभीर दखल जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडेंनी घेतली असुन कालच्या 24 एप्रिल रोजी रस्ता चौपदरीकरणाच्या मागणीचे पत्र केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे. आज दि.03 रोजी सकाळी 11 वा.स्वत: खासदार अधिकार्‍यांना सोबत घेवुन रस्त्याची स्पॉट पाहणी करणार आहेत.
लातुर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर विशेषत: बर्दापुर फाट्यानजीक सतत होणारे अपघात काळजीचा विषय बनला आहे. रस्ता झाल्यापासुन नाही म्हटलं तरी 120 लोकांचे प्राण या रस्त्यावर गेले. बर्दापुर फाटा ते अंबाजोगाई चार पदरी रस्त्याची मागणी जनतेमधुन होत आहे. मागच्या आठवड्यात याच रस्त्यावर दोन मोठे अपघात होवुन दहा पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला. वर्तमान परिस्थितीची जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडेंनी गंभीर दखल घेत मागच्या आठवड्यात केंद्रिय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवुन उर्वरीत रस्ता चार पदरी करण्याची मागणी केलेली आहे. आज दि.03 रोजी स्वत: खासदार अधिकार्‍यांना सोबत घेवुन या रस्त्यावर ज्या ठिकाणी अपघात होतात त्या पॉईंटची स्पॉट पाहणी करणार आहेत. काल त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री स्वामी यांना संपर्क करून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना देखील केल्या आहेत. उदा.चार पदरीकरणाचा तात्काळ प्रस्ताव पाठवणे आणि जिथे अपघात होतात त्या पॉईंटवर स्पीड ब्रेकर आणि नामफलक लावणे. अंबा कारखान्याजवळील प्रलंबीत पडलेल्या पुलाचे बांधकामही सुरू करण्याच्या बाबतीत खात्या अंतर्गत हालचाली सुरू झाल्याचे कळते. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली स्पॉट पाहणी केल्यानंतर लोकांच्या मागणीनुसार सदर रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी ताकद मिळु शकते हे नक्कीच.

Exit mobile version