बीड, दि.30 (लोकाशा न्युज)-ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडकडे पाहिले जात असले. तरी राजकीय परिघात बीड जिल्हा नेहमीच सरस राहिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा संघटक ऍड. प्रज्ञाताई खोसरे यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष वाढीसाठी तसेच सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठून न्याय मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या ऍड. प्रज्ञाताई घोसरे यांच्या कार्याची राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने दखल घेऊन त्यांच्याकडे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदीधुरा देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी अॅड. प्रज्ञा खोसरे यांची निवड
