Site icon लोकाशा-बंब न्यूज

7 मे पासून नगर-आष्टी रेल्वे धावणार !
केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केला निर्णय, खा. प्रीतमताईंच्या परिश्रमाचे फळ बीडकरांना मिळणार

बीड, दि. 29 : नगर-आष्टी दरम्यान नव्याने सुरुवात होणारी रेल्वे 7 मे  रोजी धावणार असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले आहे.
मुंबई येथे आयोजित भायखळा रेल्वे स्थानकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा, भाजपच्या शायना एन. सी., रेल्वेचे जनरल मनेजर अनिल कुमार लाहोटी उपस्थित होते. वास्तविक पाहता या मार्गसाठी बीडच्या विद्यमान खासदार प्रीतमताई मुंडे यांनी अगदी पहिल्यापासूनच प्रचंड मेहनत घेतलेली आहे, मग विनाकारण टीका करणाऱ्या विरोधकांशी दोन हात करणे असो की या मार्गासाठी निधी खेचून आणणे असो, या मार्गसाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचेच फळ आता बीडकरांना मिळणार आहे.

नगर बीड परळी रेल्वे मार्गावरील आष्टी पर्यंतचे पूर्ण काम झाले आहे. आष्टी सोलापूरवाडी आणि नारायणडोह हे तीन स्टेशन पूर्ण झाले आहेत. गेल्या महिन्यात या ट्रकवर रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण तपासणी करण्यात आली. या ट्रकवर १२० प्रती तास वेगाने मोठी रेल्वे धावली, त्यामुळे या ट्रकवरील रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता ह्या रेल्वेचे उद्घाटन  केंद्रीय  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे आणि नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रमुख  उपस्थितीत रेल्वेचे अधिकारी उपस्थितीत असणार आहेत. 
या रेल्वे मार्गासाठी दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर, स्वर्गीय माजी मंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी प्रयत्न केले होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध  झाला, यासाठी सातत्याने राज्याच्या तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे आणि खासदार प्रीतमताई मुंडे यांनी पाठपुरावा केला, जेवढा निधी केंद्र देईल अगदी तेवढाच निधी पंकजाताईंनी राज्य सरकारकडून मिळवून दिला, त्यामुळे आज हा रेल्वे मार्ग पूर्णत्वाकडे जात आहे, राज्यातील सरकार गेल्यानंतरही याच मार्गाच्या निधीवरून खासदार प्रीतमताईंनी राज्य सरकारवर निशाणा साधला, यामुळे काही ना काही प्रमाणात राज्य सरकारला या रेल्वे मार्गसाठी निधी द्यावा लागला,
अहमदनगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर लोहमार्गाचे काम ही पूर्ण झालेले आहे.
नगर ते नारायणडोह पर्यंत 17 मार्च 2018 रोजी सात डब्याच्या रेल्वेची चाचणी झाली होती . नंतर नगर – नारायणडोह – सोलापूरवाडी या 15 किमी अंतरावर दि. 25 फेब्रुवारी 2019 रोजी 7 डब्याची रेल्वे चाचणी झाली. त्यानंतर गेल्या 29 डिसेंबर रोजी नगर ते आष्टी दरम्यात चाचणी झाली.
दि. 9 डिसेंबर रोजी नगर कडा दरम्यान दोन डब्यांची रेल्वे गाडी आणून चाचणी झाल्यानंतर आता नगर ते आष्टी या साठ किलोमीटर अंतरावर हायस्पीड रेल्वे ( ताशी 144 किमी वेग ) चाचणी झाली आहे. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोलापूरवाडी ते आष्टी या 31 किलोमीटर रेल्वेमार्गावर पहिल्यांदाच बारा डब्यांची रेल्वे गाडी धावली. आता या रेल्वे मार्गावरून प्रत्येक्ष रेल्वे धावणार असल्यामुळे बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Exit mobile version