Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्हा परिषदेचा मास्तर निघाला क्लब चालक, कळंब पोलिसांनी मुसक्या आवळल्या, कुमावत साहेबांच्या भीतीने मास्तरने बीड उस्मानाबादच्या सरहद्दीवर जुगार अड्डा मांडला, क्लबवर सर्व बीडचे 16 जुगारी, 63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त


नांदुर घाट दिनांक 29 अमोल जाधव
सध्या क्लबवर जिल्हा परिषदेचे शिक्षक जास्त आढळून येऊ लागले आहेत आता तर स्वतः क्लब चालकच जिल्हा परिषद चे शिक्षक होऊ लागले आहेत बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या वाशी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या गिरवली शिवारात बुधवारी रात्री दहाच्या दरम्यान कळम चे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश आणि वाशी पोलीस स्टेशनच्या पथकाने पत्त्याच्या क्लब वर धाड टाकून सतरा जुगारी यांच्या मुसक्या आवळल्या या सतरा जुगारी मध्ये बीडचे सोहळा व एकच जागा मालक पकडला हा क्लब नारे वाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असणारा उमेश भगवान मुंडे हा या क्‍लबचा मालक असल्याचे पोलिसांनी सांगितले या सर्व जवळील 63 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बीड जिल्ह्यामध्ये शिक्षकांना वेगळाच नाद असल्याचे वारंवार दिसून आले कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षक ज्ञान गर्जना सोडून वेगळ्याच नादात असल्याचे वारंवार दिसून आले बीड जिल्ह्यामध्ये पंकज कुमार कुमावत साहेबांची एवढी भीती निर्माण झाली दोन नंबर धंद्यावाल्या ची पळताभुई दिसली परंतु कुमावत साहेबांच्या भीतीने जुगाराचा नाद लागलेला शिक्षक यांनी बीड जिल्ह्याची सरहद असणाऱ्या परंतु हद्द उस्मानाबाद जिल्हा गिरवली शिवारात क्लब सुरू करून राज रोज जुगार चालू ठेवला विद्यार्थ्यांना हा मास्तर काय शिकवणार व भविष्य घडणारी पिढी यांच्यापासून काय आदर्श घेणार नारेवाडी तालुका केज या ठिकाणी शाळेवर देखील हा शिक्षक कधी येतो कधी नाही व गुंडगिरीची भाषा बोलतो असे गावातील नागरिक सांगतात .
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की गिरवली शिवारातील एन एच 52 रोड लगत बाळासाहेब मोठे यांच्या कॉम्प्लेक्स मधील दुकानात पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती गुप्त बातमी द्वारा सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांना समजतात त्यांनी स्वतः पथक तयार करून सोबत वाशी पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने सदरील ठिकाणी छापा मारला असता जहूर कमृद्दिन काजी लोणी शहाजनपुर शेख अन्वर शेख मोहम्मद पांडुरंग अंकुश माटे भारत नारायण ढगे प्रकाश देऊ चव्हाण मारुती भाऊराव डोने रुस्तुम आसाराम लांडे अरुण बाबुराव ताटकर शेख चांद शेख हमीद मनीष शांतीलाल वझे सागर सुनिल राऊत भानुदास एकनाथ उगले व क्लब मालक उमेश भगवान मुंडे असे एकूण 17 आरोपी क्लब खेळताना पकडले असल्याचे पोलिसांनी सांगितले या सर्व क्लबचा मालक नारे वाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असणारा उमेश भगवान मुंडे हा असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले विशेष म्हणजे बीड हद्दीवरून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर परंतु उस्मानाबाद सरहद असणाऱ्या हद्दीत जुगार खेळणारे पकडण्यात आलेले सर्वच बीड येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले कुमावत साहेबांच्या भीतीने सरहद्दीवर जाऊन जुगार खेळणारे यांना कळम चे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी चांगलाच हिसका दाखवला आता बीड जिल्हा परिषद शिक्षकावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे आहे या छाप्या मध्ये चार स्कार्पिओ कार एक स्विफ्ट डिझायर कार एक इनोवा कार तसेच ब्रँडेड मोबाईल तसेच रोख रक्कम असा 63 लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला

Exit mobile version