Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळीत गुटखा आणि बिंगो माफियांना एएसपी पंकज कुमावतांचा पुन्हा दणका‌; परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल, अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले

परळी वैजनाथ दि २९ ( लोकाशा न्युज ) :- परळी शहरात गुटखा आणि बिंगो नावाच्या ऑनलाइन जुगाराने थैमान घातले असून अनेक नागरिकांचे तरुणांचे आरोग्य धोक्यात आले असून बिंगो नावाच्या जुगाराचे अनेक तरुण बळी पडत आहेत. अशाच गुटखा आणि बिंगो माफियांना सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने जोरदार दणका दिला असून परळी शहरात विविध ठिकाणी छापे मारीत शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. कुमावतांच्या पथकाने अचानक दणका दिल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस शहरांमध्ये सर्रास गुटखा विक्री जोरात सुरू असून बिंगो नावाच्या ऑनलाइन जुगारानेही थैमान घातले आहे. गुटखाने अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून बींगो नावाच्या ऑनलाइन जुगाराचेही शिक्षण घेत असलेले अनेक तरुण बळी पडत आहेत. ह्या बाबींचा सुगावा सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना लागला त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार आपल्या पथकातील बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे, रामहरी भंडारे आदींना
दि २८ एप्रिल २०२२ रोजी परळी शहरात मोहिमेवर पाठवले. या पथकाने मा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांनी दिलेल्या गुप्त बातमीनुसार परळी शहरात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून धाडीमध्ये संतोष मस्के आपले स्वतःचे फायद्याकरता विनापरवाना बेकायदेशीर रीत्या परळी येथील जलालपूर रोडवरील शरद टेंडर्स मध्ये गोवा गुटखाचा माल चोरटी विक्री करण्यासाठी जवळ बाळगून आहे तसेच इसम नामे नामदेव पारदे हा बस स्टँड समोरील सपना कॉम्प्लेक्समध्ये बेकायदेशीररित्या ऑनलाइन बिंगो नावाचा जुगार खेळावर लोकांकडून पैसे लावून जुगार खेळवीत असतांना रंगेहात पकडून किसन ताब्यात घेऊन त्याचेकडून नगदी १७,६५०/- व ऑनलाईन जुगाराचे साहित्य ३८,०००/- रुपये असा एकूण ५६,१५०/- रुपयाचा माल जप्त करून सदर इसमास ताब्यात घेतले तसेच जलालपूर रोड वरील शरद ट्रेडर्स येथे रात्री साडे आठ वाजता छापा मारून सदर ठिकाणी संतोष धोंडीबा मस्के हा जागीच गुटखा विक्री करीत असताना मिळून आल्याने त्याचे समक्ष दुकानाची झडती घेतली असता दुकानांमध्ये गोवा गुटख्याचा माल मिळून आला ज्याची अंदाजे किंमत १ लाख २६ हजार ६५३ मिळून आल्याने वरील दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे परळी शहर येथे कायदेशीर फिर्याद घेऊन गुन्हे दाखल केले आहेत. सदरची कारवाई करण्यापूर्वी मोहिमेवर असलेल्या या पथकाने अंबाजोगाई येथे अवैद्य वाळू वाहतूक करणारा हायवा टिप्पर क्रमांक एम एच २२/ ए एन ५५५५ मिळून आल्याने त्यास पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे लावून कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे, रामहरी भंडारे यांनी मोठ्या शिताफीने केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तर त्यांच्या अचानक केलेल्या कारवाईने परळी शहरातील अवैध धंदे वाल्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

Exit mobile version