Site icon लोकाशा-बंब न्यूज

12 आणि 13 मे रोजी झेडपीतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या होणार बदल्या, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, पशुधन विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांचा बदल्यांमध्ये समावेश



बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : एकाच ठिकाणी तीन ते पाच वर्षे ठाण मांडून बसलेल्या वर्ग 3 आणि वर्ग 4 अधिकारी, कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या तर काहींना गैरसोय वाटत असेल तर विनंती बदल्या प्रत्येक वर्षी करण्यात येतात. बीड जिल्हा परिषदेने यावर्षी या बदल्यांसाठी 12 आणि 13 मे या दोन दिवसांचा मुहूर्त काढला आहे.
जिल्हा परिषदेच्या एकूण 9 ते 10 विभागांनी बदलीसाठी किती वर्ग 3 आणि 4 चे कर्मचारी पात्र आहेत, याचा आराखडा तयार केलेला असून तो सामान्य प्रशासन विभागाकडे जमा करण्यात आला आहे. या बदल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये समुपदेशनाने करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत अशा ठिकाणी या कर्मचार्‍यांची समुपदेशनाने बदली होणार आहे तर विनंती बदल्यांमध्ये आपल्याला गैरसोयीचं ठिकाण बदलून सोयीचं ठिकाण मिळावं यासाठीही काही वर्ग 3 आणि 4 च्या कर्मचार्‍यांनी विनंत्याही प्राासनाकडे दिल्या आहेत. विनंती अर्ज बदल्यांमध्ये अनेक कर्मचार्‍यांनी आपल्या राजकीय लागेबांधेकडून वशिले लावण्यास आतापासूनच सुरुवात केलेली आहे. प्रशासकीय आणि विनंती बदल्यानंतर तालुकास्तरावर ग्रामसेवकांच्या तालुक्यांतर्गत बदल्या होतात. या कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या संख्येने ग्रामसेवकांची संख्या आहे. एका तालुक्यातून दुसर्‍या तालुक्यात काम केलेल्या ग्रामसेवकांची बदली करण्यात येते मात्र काही ग्रामसेवक तालुक्यात मुरलेले असल्यामुळे पाच वर्षे झाले तरी या तालुक्यात आपल्याला पुढेही काम करायला मिळावे यासाठी वशिले लावताना पहायला मिळत आहे. बदल्यांमध्ये बांधकाम विभागाचे सहायक अभियंता, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, ग्रामविकास विभागाचे विस्तार अधिकारी, पशुधन विस्तरा अधिकारी आणि लिपिक व शिपाई यांचाही या बदल्यांमध्ये समावेश आहे.

Exit mobile version