बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचार्यांच्या आरोग्य तपासणीसाठी उद्या दि. 27 एप्रिल रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात सदर शिबिराचे उद्घाटन सीईओ अजित पवार यांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी वासुदेव सोळंके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आज प्रथमतः बांधकाम-1, 2, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण आणि लघु पाटबंधारे विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांची आरोग्य तपासणी होणार आहे. या मध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी व रक्त तपासणी होईल. कर्मचार्यांचे आरोग्य सुद्धा चांगले असणे गरजेचे आहे, जेणेकरून चांगले काम त्यांच्याकडून करून घेता येईल, आणि तपासणीत एखादा आजार समोर आल्यास त्याच्यावर तात्काळ उपचार करता येईल, त्यामुळे या शिबीराचा पाच विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सोळंके यांनी केले आहे.
उद्या होणार झेडपीच्या पाच विभागातील अधिकारी-कर्मचार्यांची आरोग्य तपासणी, आरोग्य तपासणीचा सर्वांनी लाभ घ्यावा : सोळंके
