Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडच्या तहसीलदार पदाची जबाबदारी आता सुहास हजारेंकडे !
धारूर, केजमधील कामगिरी ठरली लक्षवेधी

बीड-(प्रतिनिधी) प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोक्यावर काटेरी मुकुट अनेकदा आपल्याला माध्यमातून ऐकावयास मिळते मात्र हे सत्य आहे.  याच काटेचे मुकुट बीडचे भूमिपुत्रप सुहास हजारे यांनी डोक्यावर घेतला आहे.  सुहास हजारे हे यापूर्वीही तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या काळात त्यांचे अत्यंत जवळचे म्हणून त्यांची ख्याती होती. आता पुन्हा एकदा बीड तहसीलदार पदाची जबाबदारी सुहास हजारे यांच्याकडे आली आहे.  हजारे हे बीड चे तहसीलदार म्हणून नियुक्त झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांतून आनंद व्यक्त होतोय.  तहसीलदार हजारे हे सर्वसामान्यांना तत्पर मदत करतील अशीच अपेक्षा जनसामान्यांचे आहे. तहसीलदार पदाचा कारभार घेतल्यानंतर त्यांचा उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, शिरूर चे तहसीलदार भेंडे, चौरे , तलाठी घोडके यांच्यासह आदींनी सत्कार केला.

Exit mobile version