Site icon लोकाशा-बंब न्यूज

अखेर गुणरत्न सदावर्तेंची 18 दिवसांनी जेलमधून सुटका, कारागृहातून बाहेर पडताच सरकारविरोधात झाले आक्रमक


मुंबई, दि. 26 (लोकाशा न्यूज) : वकील गुणरत्न सदावर्ते यांची अखेर जेलमधून सुटका झालीय. सदावर्ते गेल्या 18 दिवसांपासून कोठडीत होते. अखेर त्यांची सुटका झाली आहे. ते त्यांच्या खासगी वाहनाने आपल्या निवासस्थानाच्या दिशेला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे पुणे पोलिसांचं पथक सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आर्थर रोड कारागृहाबाहेर दाखल होतं. पण कारागृहा प्रशासनाने सदावर्ते यांचा ताबा देण्यास नकार दिला. हायकोर्टाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करणं हे आमचं कर्तव्य असल्याचं जेल प्रशासनाने पुणे पोलिसांना सांगितलं आहे. त्यानंतर सदावर्ते यांची सुटका झाली. सदावर्तेंची जेलमधून सुटका होताच त्यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. यापुढे आपण भ्रष्टाचाराविरोधात लढा देणार, असं सदावर्ते म्हणाले.
हम हैं हिंदुस्तानी! हा भारताच्या संविधानाचा विजय आहे. भारताच्या संविधानापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. हे आहेत सदावर्ते, 13 वर्षांची माझी मुलगी आणि पत्नी जयश्री पाटील. त्यांनी आणि माझ्या मित्रपरिवाराने अन्यायाविरोधात मला साथ दिली आणि महाराष्ट्राच्या, देशाचे हिंदुस्तानी कष्टकरी आमच्यासोबत राहिले. यापुढे आमचे भ्रष्टाचार हे केंद्रबिंदू असेल. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करु. पण जय श्रीराम, जय भीम, वंदे मातरम आणि हम है हिंदुस्तानी म्हणणारे हा त्यांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया सदावर्तेंनी दिली.

Exit mobile version