Site icon लोकाशा-बंब न्यूज

केज तालुक्यात पुन्हा
अंत्यविधी रोखला!

केज, दि. 26 (लोकाशा न्यूज) : केज तालुक्यातील सोनेसांगवी सुर्डी येथे दि. 26 मंगळवार एप्रिल रोजी अंबुबाई काशिनाथ साखरे (वय 75 वर्षे) या महिलेचा वृद्धापकाळाने दुपारी 3 वा. मृत्यू झाला. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावालगतच्या रिकाम्या शासकीय जागेत अंत्यविधीचे साहित्य घेऊन गेले असता त्या ठिकाणी राहणार्‍या शेतकर्‍यांनी त्याला प्रचंड विरोध केला. अंत्यविधी करू देणार नाही, असे सांगितल्याने अंत्यविधी बराच वेळ रखडला होता. या पूर्वीही दि. 4 जानेवारी रोजी लक्ष्मीबाई शहाजी कसबे या 65 वर्षीय मातंग समाजातील महिलेचे निधन झाले होते. तिचा अंत्यविधीही काही लोकांनी रोखल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी दि. 5 जानेवारी लक्ष्मीबाई कसबे हिचा मृतदेह ट्रॅक्टरमधून आणून केज तहसीलच्या आवारात ठेवला होता. त्या नंतर तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी सामाजिक कार्यकर्ते रमेश भिसे, रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, रवींद्र जोगदंड, राष्ट्रवादीचे मुकुंद कणसे, सरपंच विजयकुमार इखे यांच्यासह ग्रामस्थ व मयताच्या नातेवाईकांशी चर्चा केली अंत्यविधी केला होता. तर नंदूबाई नामदेव थोरात (वय 50 वर्ष) या मातंग समाजातील महिलेचे दि. 11 एप्रिल सोमवार रोजी निधन झाले. तिचाही अंत्यविधी रोखला गेला होता. दरम्यान दि. 26 एप्रिल रोजीही अंबुबाई साखरे हिचा अंत्यविधी रोखल्याचेही समोर आले. ही घटना कळताच महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
Exit mobile version