माजलगाव, दि.25 (लोकाशा न्यूज) : तालुक्यात नुकतेच वाळु ठेके सुरू झाले असून या ठेक्यावरून ओव्हरलोड वाळुची वाहतुक करणार्या पाच टिप्पर सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई सोमवारी तालुक्यातील विविध ठिकाणी केली आहे.
जिल्ह्यात सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत हे रूजु झाल्यापासून अवैद्य वाळु व्यवसायीकांना चाप बसला होता. त्यातच आता दोन दिवसापूर्वीच जालना जिल्ह्यातील गुंज येथील वाळु ठेका सुरू झाला आहे. या ठेक्यावरून सोमवार दि.25 रोजी तालुक्यात ओव्हरलोड येत असलेल्या पाच वाळु वाहतुक करणार्या टिप्परवर पंकज कुमावत यांच्या पथकाने केसापुरी कॅम्प, माजलगाव शहराच्या बायपास रोड भागात कारवाई करत पोलीस उपअधिक्षक कार्यालयात आणून लावत ताब्यात घेतले आहेत. या कारवाई करण्यात आलेल्या टिप्पर ज्यात एम.एच.23, ए.यु.0302, एम.एच.44, यु.0412, एम.एच.14, डि.एम.2952, एम.एच.44, यु.0779 व एक टिप्परवर नंबर खोडण्यात आलेला आहे. या कारवाई केलेल्या पथकमाध्ये डि.वाय.मोरे, अतिशकुमार देशमुख, युवराज चव्हाण हे कर्मचारी सहभागी होते.
माजलगावात वाळु वाहतुक करणारे पाच टिप्पर पकडले, आयपीएस पंकज कुमावतांच्या पथकाची कारवाई
