Site icon लोकाशा-बंब न्यूज

एसपींच्या पथकाची वाळु माफियांवर
कारवाई, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त


बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होऊन त्याची वाहतूक होतेय. पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी पथकाची नेमणूक केलेली आहे. काल सकाळी आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी या पथकाने धाडी मारून 60 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक होत असल्याची माहिती एसपींच्या पथकाला मिळताच आष्टी-बीड रोडवरील खडकत येथे पोलिसांनी दोन हायवा ताब्यात घेतले. याबाबत हायवा चालकाकडे कुठलेही कागदपत्र मिळून न आल्याने पुढील कारवाईसाठी आष्टी पोलीस ठाण्यात दोन हायवा लावण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश ढोकरट, पोलीस हवालदार संतोष गिराम, पोलीस शिपाई विशाल जगताप, पो.शि. गोविंद काळे, एकनाथ पवार यांनी केली.

Exit mobile version