Site icon लोकाशा-बंब न्यूज

वीटभट्टीसाठी मजूर पुरवतो म्हणून साडेसात लाख रुपयांची फसवणूक

अंबाजोगाई: वीटभट्टी साठी मजूर पुरवतो असे म्हणून पैसे घेऊन मजूर न देता फसवणूक केल्याचे प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अंबाजोगाई शहरातील वीटभट्टी व्यवसायिक नदीम नयु शेख (वय: ३०) यांना आरोपीने विश्वासात घेऊन मजूर ठेकेदार आहे असे सांगीतले. वीटभट्टी साठी मजूर पुरवतो असे म्हणून ७ लाख रुपये ५० हजार रुपये घेतले व शंभर रुपयांच्या बाँडवर कारनामा केला. करारनामा करूनही मजूर न देता फसवणूक केली. याप्रकरणी नदीम शेख यांच्या फिर्यादीवरून संजय पुंडलिक साठे (रा. बेलपिंपळगाव ता. नेवासा जि. अहमदनगर) याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सायक फौजदार कांदे करीत आहेत.

Exit mobile version