राजा रामा स्वामी यांना
बीड खाकीने दिला सन्मानपुर्वक निरोप
निरोपाच्या कार्यक्रमात अनेक
अधिकारी गहिवरले
बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : मागच्या चार दिवसांपुर्वीच कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आर राजा यांची पुणे येथे पोलिस उपआयुक्त या पदावर बदली झाली आहे. त्याअनुषंगाने सोमवारी त्यांना बीड पोलीस दलाकडून अधिकारी आणि कर्मचारी यांनी मानवंदना देऊन सन्मानपूर्वक निरोप दिला, गेल्या वीस महिन्यांमध्ये केलेल्या विविध कामांचा लेखाजोखा अप्पर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी मांडला. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, एपीआय मारुती मुंडे, एपीआय धस, पोलिस निरीक्षक संतोष साबळे, पोलिस निरीक्षक सतिश वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी शाखा प्रभारी अधिकारी दुय्यम अधिकारी उपस्थित होते. कर्तव्यदक्ष राजा रामा स्वामी वेळोवेळी पोलिस अधिकार्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि े भक्कमपणे पाठीशी उभा राहून केलेल्या करून घेतलेल्या विविध कामांमुळे बीड पोलिस दलाकडून गेल्या वीस महिन्यात पोलीस स्टेशन सुधारणा, गुन्हे निर्गती ,कम्युनिटी पोलिसिंग, मुद्देमाल निर्गती, तसेच नागरिकांचे विविध प्रश्न मार्गी लावल्यामुळे बीड पोलिस दलातील अधिकार्यांसोबतच्या समन्वयातून झालेल्या कार्यात राजा रामा स्वामी यांना निरोप देताना अधिकारी गहिवरले.
कर्तव्यदक्ष एसपी राजा रामा स्वामी यांना निरोप देताना बीड खाकीतील अधिकारी-कर्मचारी गहिवरले
