Site icon लोकाशा-बंब न्यूज

ऊसतोड मजुरांवर प्राणघातक हल्ला, पाच जण जखमी, चौघांविरोधात गुन्हा दाखल

तलवाडा प्रतिनिधी

उसाच्या फडात तोडणी सुरू असताना त्या ठिकाणी आलेल्या दोघांनी किरकोळ कारणावरून दोन महिलांसह तीन पुरुषावर हल्ला केल्याची घटना राहेरी येथे घडली यामध्ये एकाच्या डोक्यावर कोयत्याने मारहाण केली असून या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत या प्रकरणी विरोधात महाराण केल्याने अट्रोसिटी ऍक्त प्रमाणे तलवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे

गेवराई तालुक्यातील तलवाडा पासून जवळ असलेल्या राहेरी शिवारात ऊस तोडणीचे काम सुरू असताना त्याठिकाणी आलेल्या चौघांनी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली ऊस तोडणीसाठी कामाला कसा आला असे म्हणून त्यांनी संभाजी रंधे शारदा यांना शिवीगाळ करून मारहाण केली ज्ञानेश्वर बाळासाहेब रंधे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केली यावेळी महादेव लाड यांनी कोयत्याने मारून ज्ञानेश्वर त्यांना जखमी केले त्याच वेळी ज्ञानेश्वर यांची पत्नी विद्या व त्याचे चुलते प्रभाकर आसाराम रंधे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करून जखमी केले या प्रकरणी ज्ञानेश्वर यांच्या फिर्यादीवरून महादेव भीमराव लाड, ज्ञानेश्वर निरंतर लाड ,अशोक निरंतर लाड, गणेश भीमराव लाड, सर्व राहणार राहेरी यांच्याविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात कलम 324 323 504 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकरी गेवराई हे करत आहेत यामध्ये एक आरोपीस अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी,तलवाडा पोलीस स्टेशन चे सपोनि प्रताप नवघरे यांच्या सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते

Exit mobile version