खाकीतला जबाबदार अधिकारी उधळला, ठाण्यात राडा घालून अकलेचा दिवा पाजळला — उपविभागीय पोलीस अधिकारी जायभाये यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार
Lokasha Abhijeet
माजलगाव : लोकाशा न्युज पोलीस ठाण्याच्या आवारात लोकांना का बसू दिले म्हणून येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला आई बहिणीवर शिवीगाळ करून आवारात असलेले बेंच पाडून एका जबाबदार अधिकाऱ्याने पब्लिक देखतच राडा घालून चांगलाच अकलेचा दिवा पाजळल्याची घटना दि. 16 रोजी घडली असून ज्या पोलीस शिपायास शिवीगाळ केली त्यांनी आता यात ग्रामीण पोलीस ठाण्यात सदरील अधिकाऱ्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की , दि 16 रोजी तक्रारदार पोलीस शिपाई एस. एच. राठोड हे कर्तव्यावर असताना दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी जायभाये हे ग्रामीण पोलीस स्टेशनला आले. ते आल्यानंतर त्यांना रीतसर सॅल्युट दिला असता त्यांनी ठाण्याच्या आवारात हे कोण लोक जमा झालेत तुम्ही त्यांना इथे का थांबू दिले असा प्रश्न विचारल्यानंतर अपघातातील गाडीच्या चौकशीसाठी कांही तर कांही लोक हे फिर्याद घेऊन आल्याचे उत्तर राठोड यांनी दिले. अचानकच जायभाये यांचा पारा चढला व त्यांनी येथील बेंच तोडण्याचे फर्मान काढले तसेच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राठोड यांना तर सर्वांसमक्ष आई बहिणीवर शिवीगाळ करत सिमेंटचे बेंच तोड म्हणू लागले. राठोड यांनी माझा पाय फ्रॅक्चर असल्याचे सांगितले असता तुझा दुसरा पायही फ्रॅक्चर करून टाकली. तुला सस्पेंड करील, मी भोकरदनला असताना अनेकांची वाट लावली आता तुझी पण वाट लावतो म्हणत गलिच्छ शिवीगाळ करून सर्वांसमक्ष अपमानित केले तसेच या सर्व प्रकरणी माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या बाबतीत कांही अनुचित घडले तर त्यास जायभाये हेच जबाबदार असतील आशा आशयाची तक्रार पोलीस शिपाई एस. एच. राठोड यांनी ग्रामीण पोलिसात दाखल केली आहे. दरम्यान जायभाये यांच्या या कृत्यामुळे जे फिर्याद दाखल करण्यासाठी आले होते त्यांनाही दमदाटी करून एका दलित व्यक्तीची फिर्याद घेतली नाही उलट बेंच पाडायला भाग पाडले म्हणून त्यांनीही जायभाये यांच्याविरुद्ध तहसीलदार यांच्याकडे तक्रार देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे. कायद्याच्या राक्षकाकडूनच जर असा राडा पहायला मिळत असेल तर अपेक्षा कोणाकडून करायची असा सवाल उपस्थित होत असून अशा अधिकाऱ्याची नशा वरिष्ठांनी उतरावी अशी मागणी देखील सर्वसामान्यांकडून होत आहे. Attachments area