Site icon लोकाशा-बंब न्यूज

चोरीच्या उद्देशाने गर्दीत घुसला अन् फसला ! पोलिस निरीक्षक रवि सानप आणि त्यांच्या टिमने चोरटा गजाआड करून केलेल्या तपासामुळे दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची झाली उकल


बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : धार्मिक उत्सवातील गर्दीत चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या एका चोरट्यावर पोलिसांची नजर पडली अन् त्याचा डाव फसला. पोलिसांनी बेड्या ठोकून कसून चौकशी केली. यावेळी त्याच्याकडेनू चार दुचाकी हस्तगत केल्या. बीड शहर ठाण्याच्या पोलिसांनी 11 एप्रिल रोजी कारवाई केली.
रोहन गायकवाड (वय 25 रा.पात्रुड गल्ली बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे. तो कुख्यात गुन्हेगार आहे. दुचाकीचोरी, लुटमारीत तो माहीर आहे. दरम्यान 10 एप्रिल रोजी राम जन्मोत्सवानिमित्त शहरात मिरवणूक निघाली. यावेळी गर्दीत रोहन गायकवाड याने प्रवेश केला. ही बाब शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवि सानव यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यास ताब्यात घेवून ठाण्यात नेले. यावेळी त्याने कबाडगल्लीत आठ दिवसांपुर्वी अशोक घोडके यांच्या मालकीची मोटर सायकल चोरल्याची कबूली दिली. याशिवाय शिवाजीनगर ठाणे हद्दीतील एक दुचाकी चोरीचा गुन्हाही त्याने कबूल केला. त्याच्याकडे चार दुचाकी आढळून आल्या. त्या जप्त केल्या असून दोन दुचाकी कोठून चोरल्या. याबाबत विचारपुस सुरू आहे. पोलिस निरीक्षक रवि सानप, डी.बी.पथकाचे हवालदार बाळासाहेब सिरसाट, अंमलदार आशपाक सय्यद, मनोज परजणे यांनी ही कारवाई केली. या कारवाईबद्दल बीड शहर पोलिसांचे सर्वस्तरातून कौतूक केले जात आहे. दरम्यान सदर आरोपीला चार दिवसांची कोठडीही ठोठवण्यात आली होती.

Exit mobile version