Site icon लोकाशा-बंब न्यूज

इतर जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणार्‍यांनाही पंकज कुमावतांचा दणका, ऑनलाईन लॉटरी, गुटखा, बेकायदेशीर दारू विक्रीवर केली कारवाई


बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : 15 एप्रिल रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना परिक्षेत्र औरंगाबाद यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोलीस ठाणे पाचवड जिल्हा औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाणे पाचोड हद्दीत पाचोड व विवहा मांडवा येथे काही इसम आपल्या स्वत:च्या फायद्याकरिता विनापरवाना बेकायदेशीररित्या दारू विक्री, ऑनलाईन लॉटरी, जुगार, गुटका विक्री करत आहेत, अशी माहिती मिळाल्यावरून सदरच्या माहितीच्या ठिकाणी जाऊन सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना आदेश दिल्याने सहा पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांनी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री प्रसन्न परिक्षेत्र औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः पंकज कुमावत व उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालय केज येथील व उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनासोबत घेऊन सदर माहितीच्या ठिकाणी दि. 16 एप्रिल 2022 रोजी जाऊन विविध ठिकाणांची गोपनीय माहिती काढून विवहा मांडवा (ता पैठण) येथे ऑनलाईन लॉटरी चालवणारा इसम नामे प्रकाश घोडके यांचे दुकानावर छापा मारून त्यांचे ताब्यातून ऑनलाइन लॉटरी जुगाराचे साहित्य नगदी रुपये असा एकूण 50450 रुपयांचा माल जप्त केला व राहुल बियरबारच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना दारू विक्री करणारा इसम राहुल नागवे यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून देशी-विदेशी एकूण 31406 रुपये जप्त करून अवैध गुटखा विक्री करणारे तांबोळी पान सेंटर व आदर्श मावा सेंटर याठिकाणी रेड मारून त्यांच्या ताब्यातून एकूण गुटख्याचा 11754 रुपयांचा माल जप्त केला तसेच पाचोड तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथील माऊली पान सेंटर व बस स्टँड समोरील पानटपरीवर छापे मारून चार इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून व जामखेड जिल्हा जालना शिवारातील अनिल भोजने यांचे शेतातील पत्र्याच्या शेड समोरील गाडीमधून गोवा विमल राज निवास बाबा पान मसाला हिरा गुटख्याचा माल किमती 640635 माल जप्त करून पोलीस ठाणे पाचोड जिल्हा औरंगाबाद येथे एकूण 11 आरोपीविरुद्ध एकूण चार गुन्हे दाखल केले आहेत. सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक श्री प्रसन्ना परिक्षेत्र औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत, पीएसआय संतोष भालेराव, मनोज कुलकर्णी, महिला पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी, साय्यक फौजदार शेषराव यादव, पोलीस आमदार बालाजी दराडे, राजू वंजारे, महादेव सातपुते, विकास चोपणे, रामहरी भडाने, सचिन अहंकारे, अशोक मंदे, सचिन डिडोळ, महादेव बहिरवाल, बजरंग इंगोले, अब्दुल सय्यद, खनपटे धुमाळ, मुंडे, राऊत, आसपाक इनामदार, महिला पोना आशा चौरे यांनी केलेली आहे.

Exit mobile version