Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळी तालुक्यात वीटभट्टीवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार ;ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल निर्दयी नराधम फरार

परळी वैजनाथ दि १७ ( लोकाशा न्युज ) :- परळी तालुक्यातील धारावती तांडा परिसरात वीटभट्टीवर काम करणाऱ्या आपल्या आई सोबत राहणा-या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली असून नात्यातील निर्दयी नराधमानेच हे दुष्कृत्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून नराधम फरार आहे.
याबाबत परळी ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळ परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या परंतु कामानिमित्त परळी तालुक्यातील धारावती तांडा परिसरात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत एक महिला आपल्या मुलीस शिक्षण देते. आपल्या गोरगरिबांच्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या मेहनती महिलेच्या अल्पवयीन मुलींवर नात्यातील नराधनेच असाह्य परिस्थितीचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याचे गलिच्छ दुष्कृत्य केल्याच्या संतापजनक घटना घडली.
दरम्यान ह्या घटनेने परळी तालुक्यातील वीटभट्टी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या गरीबीच्या कारणाने बाहेरगावाहून पोट भरण्यासाठी गोरगरीब कुटुंबीयांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण ठाण्यात गुरनं ९९/२०२२ कलम ३७६, ३७६(२)(फ), ३७६ (२) (जे), ३७६ (२) (एन), ३२३, ३२४, ५०४, ५०६ भादवी, कलम ३, ४,१२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे. डी. झांबरे हे करीत आहेत. अद्याप या प्रकरणी नराधम आरोपीस अटक करण्यात आलेली नाही तो फरार झाला आहे. या घटनेने परळी तालुक्यात मात्र खळबळ माजली आहे.

Exit mobile version