Site icon लोकाशा-बंब न्यूज

केजमध्ये विवाहितेची आत्महत्या;
पतीसह चौघांवर गुन्हा दाखल


केज, दि. 16 (लोकाशा न्यूज) : ट्रक घेण्यासाठी माहेरहून चार लाख रूपये घेऊन ये; म्हणून विवाहीतेचा सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून नाव्होली (ता. केज) येथील एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबासाहेब घाडगे (रा. लाखा ता. केज) यांची मुलगी राधा हिचा विवाह तालुक्यातील नाव्होली येथील अशोक वामन वरपे सोबत रितीरिवाज प्रमाणे झाला. काही दिवस आनंदात गेले. त्यांना कन्या रत्न झाले. आनंदात संसार सुरू असताना राधाला पती अशोक वरपे व सासू, सासरा व नात्यातील महिलांनी संगनमत करून मारहाण केली. ट्रक घेण्यासाठी माहेरहून चार लाख रूपये घेऊन ये म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून (दि. 15) शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास राधा अशोक वरपे (रा. नाहोली ता. केज) यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी मयताचा भाऊ सागर घाडगे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. 122/2022 भा.दं.वि. 498 (अ), 306, 323, 504 व 34 नुसार मयताचा पती अशोक वामण वरपे, सासरा वामन दादाराव वरपे, सासु मीराबाई वामन वरपे आणि मावस सासु मंदाकीनी लक्ष्मण दातार यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत. पोलीसांनी याप्रकरणी पती व सासर्‍याला अटक केली आहे.

Exit mobile version