Site icon लोकाशा-बंब न्यूज

वीस शेतकरी कुटूंबियांना मिळाले लोकनेत्याचे विमा कवच, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याचे 40 लाख आले


बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी लढा दिला. त्यामुळेच शेतकर्‍यांचा कणखर नेता म्हणून त्यांची संपूर्ण देशभरात ओळख झाली, त्यांच्या पश्‍चात त्यांच्या कन्या राज्याच्या तत्कालिन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपल्या सरकारच्या काळात साहेबांच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना अस्तित्वात आणली, आज या विमा योजनेचा जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांच्या कुटूंबियांना मोठा फायदा झालेला आहे, आजही प्रत्यक्ष होत आहे आणि येणार्‍या काळातही होणार आहे. वास्तविकत: या योजनेतील जिल्ह्यातील 20 प्रकरणे प्रलंबित होते, अखेर ती प्रकरणे पात्र ठरली असून त्या पात्र शेतकरी कुटूंबियांसाठी 40 लाख रूपयांचा निधी आला आहे. सदर योजनेतून एका कुटूंबियांना दोन लाखांची मदत केली जात आहे. कृषी विभागाला वीस पात्र शेतकरी कुटूंबियांची एक यादी प्राप्त झाली आहे. पात्र असणार्‍या या वीसच्या वारसदार यादीमध्ये पारूबाई महादेव रोकडे आष्टी, पिंगला प्रकाश येडे आष्टी, आशा रामदास चव्हाण वडवणी, गंगाबाई मोहन मुंडे, बीड, अश्‍विनी राजेभाऊ करे, धारूर, शालन राजेंद्र उंबरडे आष्टी, अर्पणा चंद्रकांत लांडगे परळी, लता परशुराम काशिद बीड, सुनिता अशोक सावंत अंबाजोगाई, जयश्री सुखदेव उंडे पाटोदा, रूक्मिणी अशोक जगताप बीड, रेखा श्रीकृष्ण मिसाळ बीड, जयश्री शंकर शिनगारे धारूर, लक्ष्मण लिंबाजी तिडके धारूर, कमलाकर साहेबराव काळे केज, स्वाती सुभाष जगताप माजलगाव, संगिता रविंद्र सारूक केज, बबिता राजाभाऊ साठे परळी, गवळाबाई संदिपान केकाण केज आणि बीडमधील नवनाथ निवृत्ती घोडसे या वारदारांचा समावेश आहे.

Exit mobile version