Site icon लोकाशा-बंब न्यूज

जालना रोडशी सलग्न रस्ते उद्या मुरुमाने जोडले जाणार,युवानेते डॉ. योगेश क्षीरसागर, अमर नाईकवाडे आणि सहकाऱ्यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

सध्या बीड शहरातील जनता जालना रोडच्या रस्ता कामामुळे त्रस्त आहे. नियोजन न करता सरसगट सिमेंट अंथरल्या मुळे वळण रस्ते बंद झालेले आहेत. शहराच्या पूर्व भागात जाण्यासाठी जवळपास एक-एक किलोमीटरची प्रदक्षिणा घालावी लागते. जवळपास पंधरा दिवसांपासून शहरातील नागरिकांचे बेहाल झालेले आहेत. यासंदर्भात आज डॉ. योगेश (भैय्या) क्षीरसागर, गटनेते फारुख पटेल,नगरसेवक अमर नाईकवाडे, शुभम धुत यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (NHAI) अभियंता श्री कसबे यांची जालना रोड येथे भेट घेऊन रस्ता कामाच्या नियोजनाच्या अभावामुळे बीड शहरातील नागरिकांचे होत असलेले हाल त्यांना प्रत्यक्ष दाखवून दिले. यासोबतच चार ते पाच ठिकाणी सिमेंट रस्त्याची जाडी टेप लावून मोजली असता आठ ते नऊ इंच एवढी आढळली जी की अंदाजपत्रकाच्या दोन ते तीन इंच कमी आहे. काम सुरू आहे तोपर्यंतच चुकांची दुरुस्ती करण्यात येऊ शकते, एकदा काम झाले तर पुन्हा दहा ते पंधरा वर्ष दुरुस्तीला वाव नाही.

जवळपास अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर जालना रोडला कनेक्ट होणारे रस्ते तात्काळ जोडून घेऊन वाहतूक सुलभ करावी. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकातील वळण रस्ता दोन्ही बाजूने तीस-तीस फूट रुंद करण्यात यावा व त्याचा उतार आणखी योग्य प्रकारे करावा. तसेच तीव्र उन्हाळ्याच्या दिवसात सिमेंट रोडवर पोते अंथरूण पाणी मारण्यापेक्षा सरळ आळे करून रोडवर पाणी मारावे जेणेकरून रोडवर ची गुणवत्ता सुधारली जाईल. तसेच श्री राम नवमी शोभायात्रेत दरम्यान नागरिकांची जी गैरसोय झाली, ती गैरसोय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, भगवान महावीर जयंती, हनुमान जयंतीला होऊ नये अशा सूचनाही आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

लोक हिताला समोर ठेवून आम्ही केलेल्या सूचना गांभीर्याने घेऊन जालना रोडला कनेक्ट होणारे रस्ते तात्काळ मुरुम भरून बुधवारी वाहतूक सुरू करण्यात येईल. यासोबतच इथून पुढील सिमेंट रस्ता कामात आळे करूनच पाणी मारण्यात येईल. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक आणखी रुंद करण्यात येईल. असे NHAI चे अभियंता श्री. कसबे व राऊत यांनी सांगितले.

 *यावेळी भैय्यासाहेब पवळे, रामदास सरवदे,अमर विद्यागर,ईश्वर धन्वे,संभाजी काळे, गिरीश मुंदडा,संतोष क्षीरसागर, संतोष चांदणे, सुधीर जोशी, शेख उमर, ज्ञानेश्वर हिंगमिरे, गजानन कदम,शुभम प्रधान,सचिन औसरमल, चेतन बेदरकर,आदी. उपस्थित होते.*
Exit mobile version