मुंबई, दि. 12 (लोकाशा न्यूज) मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडे यांना किरकोळ त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर तातडीने त्यांना उपरासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे ब्रिज कँडीवर जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे हे सध्या 46 वर्षांचे आहेत. राज्य सरकारमधील एक धडाडीचा मंत्री आणि फर्डा वक्ता अशी धनंजय मुंडे यांची मुख्य ओळख आहे. धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांना कडवी झुंज देत यावेळच्या विधानसभेत परळी मतदारसंघातून विजयी झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीय नेत्यांमध्ये धनंजय मुंडेंना पाहिलं जातं. या बातमीने राज्यात सध्या सर्वानाच धक्का बसला आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, उपचारार्थ ब्रीज कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल
